गनबावडा व परिसरात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून त्यामुळे निसर्गाने भुईबावडा व करूळ घाटातील पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या आहेत. भुईबावडा तसेच करूळ घाटातील अनेक लहान-मोठे धबधबे घाटात कोसळू लागल्याने पर्यटकांचे ते आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू पहात आहेत. लाॅकडाऊनमुळे १५ एप्रिल गगनबावडा परिसर पर्यटनाविना सुनासुना आहे. त्यामुळे धबधबे प्रवाहित होऊनही तेथे निरव शांतता आहे. ते पर्यटकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. श्रावणात दिसणारे निसर्गाचे विलोभनीय चित्र सध्या दिसू लागल्याने घाटाची मनमोहकता वाढली आहे. सारा परिसर हिरवाईने नटला आहे. दरवर्षी वर्षा पर्यटनाने हे दोन्ही घाट फुलून जातात. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पर्यटन व्यवसाय यंदा मंदित आहे. त्यामुळे येथील हाॅटेल व्यवसायही गेल्या गेल्या तीन महिन्यांपासून थंड आहे. काही हाॅटेलमध्ये पार्सल सुविधा सुरू करण्यात आली असली तरी पर्यटकांची तेथेही प्रतीक्षाच आहे.
फोटो =
पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा भुईबावडा घाटातील धबधबा प्रवाहित होऊन घाटात कोसळू लागला आहे.