कोल्हापूर : ऐन उन्हाळ््यात मुबलक पाणीसाठा असतानाही जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामांमुळे शहरासह १३ गावांत आज सोमवारी व उद्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद होणार आहे.वीज वितरण कंपनीकडून पुईखडी येथील सबस्टेशनच्या दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पुईखडी येथील ११०० एमएम जाडीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने आज, सोमवारी व मंगळवारी शहराच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणी जपून वापरावे, असे आवाहन करीत मंगळवारनंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.ए, बी वॉर्डमधील फुलेवाडी रिंगरोड परिसर, कणेरकरनगर, निचितेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, जीवबा नाना पार्क, आपटेनगर, रिंग रोड, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, बापूरामनगर, साळोखेनगर, तपोवन, देवकर पाणंद, नाळे कॉलनी, संभाजीनगर, संभाजीनगर बसस्थानक, विजयनगर, शहाजी वसाहत, श्रीकृष्ण कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, एलआयसी कॉलनी, आर. के.नगर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रेसकोर्स नाका, हॉकी स्टेडियम, आयसोलेशन, नेहरूनगर, सुभाषनगर, शेंडा पार्क, राजेंद्रनगर परिसर. ई वॉर्डमधील शुगर मिल, कसबा बावडा, लाईन बझार, नागाळा पार्क, रमणमळा, न्यू पॅलेस परिसर, ताराबाई पार्क, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, बी. टी. कॉलेज, साईक्स एक्स्टेन्शन, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, कावळा नाका, सदर बझार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, लोणार वसाहत, मार्केट यार्ड, शिवाजी उद्यमनगर, राजारामपुरी, तवनाप्पा पाटणे हायस्कूल, टाकाळा खण व माळी कॉलनी, राजारामपुरी एक्स्टेंशन, दौलतनगर, प्रतिभानगर, पांजरपोळ, शास्त्रीनगर, जवाहरनगर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहत परिसर येथे पाणीपुरवठा होणार नाही.
शहरासह १३ गावांत पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:52 AM