१५ एप्रिलला गावात कोरोनाने शिरकाव केला आणि बघता बघता पुढील १५ दिवसांत १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उपचारादरम्यान चौघांचा बळीही गेला. यामध्ये दोघा उमद्या तरुणास एका मठाधिपतीचाही समावेश होता. वाढत्या वाढत्या बाधित रुग्णांमुळे रुग्णांमुळे भीतीचे वातावरण पसरले.
यादरम्यान प्रांताधिकारी, तहसीदार, नायब तहसीलदार, सर्कल अशा विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याबरोबरच कठोर निर्बंधाच्याही सूचना केल्या. त्या अनुशंगाने स्थानिक कोविड दक्षता समिती व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत गावात आठ दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. पॉझिटिव्ह रुग्णांचा परिसर कंटेनमेंट झोन केला. संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रतिदिन तीन वेळा कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गावांतील व्यापारी व व्यावसायिकांसाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये सर्वच अहवाल निगेटिव्ह आले. प्रौढांसाठी लसीकरण मोहिमेची मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. त्यामुळे वाढत्या संसर्गाला आळा बसला.
आता गावातील केवळ एकच पॉझिटिव्ह व्यक्ती उपचार घेत असून अन्य १४ जण उपचार घेऊन घरी परतल्याने गावात समाधानाचे वातावरण आहे.
------------------------------------------------