शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

आम्ही तुम्हाला स्वीकारले, तुम्ही का नाकारता ?

By admin | Published: June 06, 2015 12:23 AM

राजेश लाटकर : महानगरपालिका हद्दवाढप्रश्नी मुश्रीफ, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांना खडे बोल

कोल्हापूर : पी. एन. साहेब, आपण करवीरचे नेतृत्व करता... मुश्रीफसाहेब, आपण कागलमध्ये राहता... आमदार महादेवराव महाडिक, आपण तर शिरोलीत राहूनही गेली पंधरा वर्षे महापालिकेचे नेतृत्व केलेत... बंटीसाहेब, आपण शहरात राहूनही हद्दवाढीबाबत उदासीन आहात... आम्ही शहरवासीयांनी तुमच्या ग्रामीण अंगाकडे डोळेझाक करून तुमचे नेतृत्व स्वीकारले अन् तुम्ही मात्र शहराच्या हद्दवाढीला विरोध करता? असा खडा सवाल राष्ट्रवादीचे गटनेते व शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत उपस्थित केला. गेली पंधरा वर्षे सत्तेत असूनही कॉँग्रेस व राष्ट्रवादीला शहराची हद्दवाढ करता आली नाही, हे आमचे अपयश असल्याची खंतही लाटकर यांनी यावेळी बोलून दाखविली.शहरालगतच्या गावातील जनतेला शहराच्या सर्व सोयीसुविधा वापरावयास हव्यात; हद्दवाढ मात्र नको आहे. हद्दवाढ नको म्हणणाऱ्या गावांच्या अग्निशमनसारख्या अत्यावश्यक सेवा आम्ही रोखण्याचा आग्रह धरल्यास चालेल काय? शहरात येऊ न दिल्यास शेतातील भाजी कुठे विकणार? महाविद्यालयीन शिक्षणासह उच्च आरोग्यसेवा कुठे घेणार? शहरात या; मोठ्या भावाप्रमाणे तुमची देखभाल करू. ‘ड’ वर्ग पालिकेत सर्वांत चांगला कारभार आमचा आहे. घोटाळे काय ग्रामीण भागात कमी आहेत काय? पराचा कावळा करून शहराचा श्वास रोखण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशाराही लाटकर यांनी यावेळी दिला. ऐतिहासिक कोल्हापूरची हद्दवाढ रोखण्याचा प्रयत्न झाल्यास मोर्चे, आंदोलने व उपोषणे केली जातील. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, केएमटी, शिक्षण, अग्निशमन अशा सेवा रोखण्यास आम्हाला भाग पाडू नका. प्रसंगी आताच नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागला तरी हरकत नाही. मात्र, हद्दवाढ झाल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे स्थायी समितीचे आदिल फरास यांनी यावेळी ठणकावून सांगितले.ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याखेरीज हद्दवाढीच्या प्रस्तावास काही अर्थ नाही. उपनगरांत सुविधा देण्यास प्रशासन अपुरे पडत असल्याचा आरोप होतो. आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आणलेल्या निधीव्यतिरिक्त प्रशासनाने स्वनिधीतून कोणती विकासकामे केली? प्रशासनाने विरोधामागील योग्य तो बोध लक्षात घ्यावा. हद्दवाढीस विरोध करणारे ग्रामीण भागांतील सर्व नेते शहरातच राहतात. नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करू. मनपा प्रशासनानेही ग्रामीण भागात हद्दवाढीसाठी जनजागृती मोहीम आखावी, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. कागदी घोडे नाचविण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव नको, तर ठोस निर्णय होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचा निर्धार महापालिकेच्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)दादा... आपण ब्रेन आहात...!दादा, आपण सरकारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहात. सरकारचे ब्रेन आहात. आम्हास सत्ता असताना हद्दवाढीचे शहाणपण सुचले नाही. ती चूक आपण करू नका. हद्दवाढीचे प्रस्ताव अनेकवेळा गेले. तसा हा प्रस्ताव ठरावयास नको. हद्दवाढ करा म्हणजे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारात चांगला मुद्दा सापडेल. हद्दवाढ करणार असाल तर विशेष अधिकार वापरून प्रस्ताव आल्यानंतर दोन दिवसांत अधिसूचना काढा. नाहीतर आठ दिवसांत महापालिकेचे ‘अ’ वर्ग नगरपालिकेत तरी रूपांतर करा, अशी मागणी राजेश लाटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली.