आम्हीपण मराठ्याची औलाद, दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचे विरोधकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 09:11 PM2023-09-10T21:11:58+5:302023-09-10T21:13:02+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटांच्या राज्यभर सभा सुरू आहेत.

We, the children of the Marathas, do not beg for pressure; Ajit Pawar's criticism of opponents | आम्हीपण मराठ्याची औलाद, दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचे विरोधकांवर टीकास्त्र

आम्हीपण मराठ्याची औलाद, दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचे विरोधकांवर टीकास्त्र

googlenewsNext

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांनी केल्हापूरात सभा घेतली होती. आता कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तरदायित्व सभा घेतली आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांच्यासह अन्य नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 

शरद पवारांबद्दल वाईट बोललो नाही, पण मला दु:ख झालं; भुजबळांची बीडमध्ये टीका, कोल्हापूरात कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोल्हापुरात होणारी उत्तरदायित्व सभा मझ्यासाठी महत्वाची आहे, कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र कायम राहील आहे. सध्या बळीराजावर दुष्काळच सावट आहे हे दूर करावं ही  अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील अनेक भागात अजून म्हणाव तसा पाऊस झालेला नाही, असं सांगून पवार यांनी सभेला सुरुवात केली. राज्यात सर्व समाजासाठी काम सुरू आहे.

"काहीजण सांगतात अजित पवार आणि आमदारांवर दबाव होता म्हणून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हो आमच्यावर दबाव होता, लोकांची काम पूर्ण करण्यासाठी दबाव होता. अडिच वर्षात आम्ही सरकारमध्ये हाती घेतलेली काम पूर्ण करण्याचा दबाव होता. अनेकांच्या कामावर स्थगिती होती.मग काय आमची चूक झाली. दुसरा कुठलाही आमच्यावर दबाव नव्हता, आम्हीपण मराठ्याची औलाद आहोत, आम्हीही शेतकऱ्यांची मुल आहोत. आमची बदनामी करण्याच काम सुरू आहे.यात काही तथ्य नाही, असंही अजित पवार म्हणाले.  

'माझ्यावर टीका करणाऱ्यांना करुदेत, मी माझ्या कामापासून हटणार नाही. सकारात्मक टीका करणाऱ्यांचे मी स्वागत करतो. मी सरकाच्या माध्यमातून तमाम बहुजणांना न्याय देण्याच काम करेन, आम्ही काम करण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरवणीवर आहे. सरकारच यावर काम सुरू आहे, असंही पवार म्हणाले.  

Web Title: We, the children of the Marathas, do not beg for pressure; Ajit Pawar's criticism of opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.