कोल्हापूर : मुलगाच हवा, मुलगी नकोच, या दोन्ही टोकांच्या भूमिकेपेक्षा ‘एक मुलगा, एक मुलगी’ असा मध्यममार्ग कोल्हापूरकरांनी जवळ केल्याचे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेवरून दिसते. ‘हम दो, हमारे दो’ या भूमिकेमुळे जिल्ह्याचा जनन दरही घटला असून, तो राज्यात सर्वांत कमी आहे. दर घटला असला, तरी आजही कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा भार स्त्रियांवर टाकला जात आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुष शस्त्रक्रियेचे प्रमाण खूपच कमी आहे.जननदरात घट होत असली तरी लिंगानुसार विभागणी केली, तर अजूनही मुलांनाच प्राधान्य दिले जात असल्याचेही वास्तव आहे. एका मुलीवर किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. गेल्या वर्षभरात १४ हजार ७६७ स्त्रियांनी, तर ३२१ पुरुषांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. त्यापैकी एका मुलीवर ८५ स्त्रियांनी, तर केवळ सहा पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतली. याउलट एका मुलग्यावर १९८ स्त्रिया, तर १२ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या. ‘एक मुलगा-एक मुलगी’ यावर मात्र वर्षभरात १0 हजार २0 स्त्रियांनी, तर १७३ पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या. यावरून आजही ‘एक मुलगा, एक मुलगी’ हे सूत्रच लोकप्रिय असल्याचे दिसते.लोकसंख्येचा भस्मासूर रोखण्यासाठी शासनाने ‘हम दो हमारे दो’, ‘हम दो हमारा एक’ असे घोषवाक्य घेऊन २0 वर्षांपूर्वी विशेष अभियान राबविले. एकेका कुटुंबात अर्धा एक डझन मुले-मुली असे चित्र असणाºया कोल्हापुरात या अभियानाने मानसिकता बदलण्याची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. शासनाचे प्रयत्न आणि सुशिक्षित कुटुंबांच्या वाढलेल्या संख्येमुळे या मानसिकता बदलाच्या प्रयत्नांना चांगले बळ मिळाले. परिणामी वेगाने वाढत चाललेल्या जननदराला ब्रेक लागला. गेल्या पाच वर्षांचा आलेख काढला, तर जननदरात वर्षागणिक घट होत चालल्याचे दिसते. देशाचा जननदर २.३ टक्के आहे, राज्याचा १.८ टक्के आहे, तर कोल्हापूर जिल्ह्णाचा १.६ टक्के इतका आहे.एक अपत्य असण्याचेही प्रमाण वाढलेशहरीकरण आणि करिअरला प्राधान्य देण्याच्या मानसिकतेमुळे एक अपत्य असणाºया पालकांचीही संख्या वाढली आहे. एक अपत्यावर ३६५ जणांनी शस्त्रक्रिया केली. दोन अपत्य असणाऱ्यांचे प्रमाण तब्बल नऊ हजार ९0९, तर तीन अपत्ये असणाºयांचे प्रमाण दोन हजार ८५७ आहे. एक अपत्याचा आग्रह असतानाच चार आणि पाच अपत्ये असल्याचेही दिसते. ३६१ शस्त्रक्रिया या चार अपत्यांवर, तर २९ या पाच अपत्यांवर झाल्या आहेत.कुटुंबनियोजनाचा भार स्त्रियांंवरचजिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेपैकी स्त्रियांच्या ६९ टक्के, तर पुरुषांच्या केवळ १0 टक्केच शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.त्यामुळे आजही स्त्रियांवरच कुटुंबनियोजनाचा भार असल्याचे दिसते. स्त्रियांच्या १९ हजार ३२१ च्या उद्दिष्टांपैकी १३ हजार ५२१, तर पुरुषांच्या १६0८ पैकी १७४ शस्त्रक्रिया वर्षभरात झाल्या आहेत.
‘हम दो, हमारे दो’मुळे लोकसंख्या वाढीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:39 AM