कोल्हापूर : आयकर विभागाने यापूर्वी माझी चौकशी केलेली आहे, गेली सहा-सात महिने त्याची प्रक्रिया सुरू होती. जी काही चौकशी होईल, त्याला सामोरे जात असताना योग्य ते सहकार्य करु, अशी माहिती ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत कारवाईसाठी आयकर विभागाची भेट घेणार असल्याचे ट्विट किरीट सोमय्यांनी केले. याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, आयकर विभागाला यापूर्वी माहिती दिलेली आहे. आता चौकशी झाली तर त्याला सहकार्य करु.गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर शिवसेनेचे नेते नाराज असल्याबाबत विचारले असता, कालच्या मंत्रिमंडळात यावर खूप चर्चा झाली आहे, मंत्री वळसे-पाटील यांनी त्यांच्या शंकेचे निरसन केलेले आहे. आता गृहमंत्रिपद कोणत्या पक्षाला द्यायचे हा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधी यांना असल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले.भाजपने प्रचाराची पातळी पाळावीसमोर महिला उमेदवार आहे, त्यामुळे भाजपने प्रचाराची पातळी सांभाळली पाहिजे. प्रचार खालच्या पातळीपर्यंत जाता कामा नये, असे आपले म्हणणे असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले
आयकर विभागाने यापूर्वीही माझी चौकशी केली, योग्य ते सहकार्य करू - मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 5:46 PM