शिये ग्रामपंचायत परिसरातील अंगणवाड्यांना विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन सरपंच रेखा जाधव यांनी दिले. पोषण अभियानअंतर्गत पोषण पंधरवडा या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, पोषण अभियानअंतर्गत पोषण पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने हनुमाननगर, शिये (ता. करवीर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यानिमित्ताने परिसरात वृक्ष लागवड सरपंच रेखा जाधव, उपसरपंच शिवाजी गाडवे, विलास गुरव, हंबीरराव कोळी, प्रभाकर काशीद, तेजस्विनी पाटील, पूनम सातपुते, मच्छिंद्र मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच रेखा जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेबरोबर माळवाडी, श्रीरामनगर, हनुमान नगर येथील अंगणवाड्यांना विशेष निधी देण्यासंदर्भात पुढाकार घेऊ, असे सांगितले. यावेळी सुपरवायझर निलम पवार यांनी पोषण पंधरवडा या कार्यक्रमांतर्गत महिलांना माहिती दिली. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावातील महिला उपस्थिती होत्या.