लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : कोगनोळी येथील मतदारांनी ना. शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी राबवलेल्या विकास कामांची दखल घेऊन भाजपच्या उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून दिले आहे. त्या सर्व मतदारांचे आम्ही ऋण व्यक्त करतो. मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्याबरोबरच ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शी करण्यास आमचे प्राधान्य असेल, असे मत कोगनोळीतील नवनिर्वाचित भाजप सदस्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
भाजपच्यावतीने कोगनोळीमध्ये अनेक विकासकामे राबवली आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सदस्य निवडून आल्याने भविष्यातदेखील विकासकामे अधिक वेगाने करता येतील, असा विश्वास कोगनोळी भाजपचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी नूतन सदस्य सुनील माने, सुजित माने, विद्या व्हटकर, स्वाती शिंत्रे, वंदना चौगुले यांच्यासह कुमार व्हटकर, प्रीतम शिंत्रे, सचिन चौगुले, तौसिफ मुल्ला, नितीन धनवडे, बबलू पाटील, आनंदा पाटील आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.