यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे म्हणाल्या की, गावशिवारातील प्रलंबित आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सामोपचार व लोकसहभागाने वाट मोकळी करून देण्यासाठी महसूल प्रशासनाला सहकार्य करावे.
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष आनंदराव मगदूम, बाळासाहेब मेडसिंगे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य उदय चव्हाण, मंडल अधिकारी धनाजी कलिकते, शशी साळोखे, सुगंधा केनवडे, संभाजी कांबळे, सखाराम चव्हाण, शामराव मेडसिंगे, राजू नाईक, रघुनाथ चव्हाण, बाबासोा मेडसिंगे, अरविंद सरडे, श्यामराव चव्हाण, बाबासोा हजारे उपस्थित होते.
फोटो: १२ कांडगाव रस्ता
पंधरा वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या कांडगाव ता. करवीर येथील शेतरस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता खुला करताना करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर. यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे -भामरे, सरपंच रूपाली मेडसिंगे, आनंदराव मगदूम, उदय चव्हाण उपस्थित होते.