क्रीडानगरी म्हणून राज्यात कोल्हापूरची ओळख आहे. फुटबाॅल, कबड्डी, हाॅकी, नेमबाजी, टेनिस, मॅरेथाॅन, क्रिकेट आदी खेळांत कोल्हापूरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्ज्वल केले आहे. चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा लाॅन टेनिस असोसिएशनच्या मेरी वेदर मैदानावरील मंडप दुरुस्ती व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली. यावेळी मेरी वेदरसह शहरातील सर्व मैदाने, क्रीडांगणांसाठी लागणारा निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासंदर्भात निवेदनही दिले. यावेळी झालेल्या चर्चेत निधी उपलब्ध झाल्यास चांगल्या दर्जाचे मैदान या ठिकाणी होईल. त्यासोबतच टेनिस खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाही येथे आयोजित करता येतील. टेनिस संदर्भातील विविध मार्गदर्शन शिबिरे येथे घेता येईल, असे सांगितले. त्यावर क्रीडामंत्री तटकरे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले.
फोटो : २४०२२०२१-कोल-मेरी वेदर ग्राऊंड
ओळी : कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्याच्या क्रीडा व युवक कल्याणमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली.