रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत सन २०१४ साली एकूण १८१ लाभार्थ्यांना घरे देण्याचे ठरले. यासाठी शासनाकडून दोन कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये पहिल्या टप्प्यात ११२, तर दुसऱ्या टप्प्यात ६९ घरांचे बांधकाम पूर्ण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सात वर्षांचा कालावधी लोटला तरीही घरे मिळालेली नाहीत. यासंदर्भात वारंवार निवेदने, आंदोलने करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यावेळी मक्तेदारास पाठिशी घातले जात असल्याचा आरोप करत लाभार्थ्यांनी उपनगराध्यक्षांना घेराव घातला. अखेर त्यांनी दोन महिन्यात पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर लाभार्थी शांत झाले. यावेळी त्यांनी जर दोन महिन्यात घरांचा ताबा न मिळाल्यास नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा दिला. यावेळी नगरसेवक मदन झोरे, संजय केंगार, रवी रजपुते, सदा मलाबादे, सुखदेव माळकरी, बाबूराव जाधव, गणपती शिंदे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
फोटो ओळी
२८०७२०२१-आयसीएच-०१
रमाई आवास घरकूल योजनेतील लाभार्थ्यांनी ताबडतोब घरांचा ताबा मिळावा, यासाठी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या दालनात ठिय्या मारला.