शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कवाडे देतील तो उमेदवार निवडून आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:50 AM

हुपरी : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या जागावाटपामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघ जर रिपब्लिकन पक्षाकडे गेल्यास प्रा. जोगेंद्र कवाडे जो ...

हुपरी : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या जागावाटपामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघ जर रिपब्लिकन पक्षाकडे गेल्यासप्रा. जोगेंद्र कवाडे जो कोण उमेदवार निश्चित करतील त्याला निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपली असेल, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांच्यावतीने हुपरी (ता. हातकणंगले) येथे आयोजित करण्यात आलेला आशीर्वाद सोहळा व हातकणंगले तालुक्यातील पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ते म्हणाले, हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे हे पुत्र राजूबाबा आवळे यांच्यासाठी, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे आपल्या पत्नीसाठी तसेच डॉ. अविनाश सावर्डेकर व माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे असे प्रयत्नशील आहेत. चौघेही मातब्बर उमेदवार असून या सर्वांमध्ये निवडून येण्याची निश्चितपणे क्षमता आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही तसेच आजच प्रा. कवाडे यांनी हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मित्रपक्षांबरोबर चर्चेअंती जर हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षांसाठी सोडण्यात आला तर या ठिकाणी प्रा. कवाडे जो उमेदवार देतील त्याला निश्चितपणे निवडून आणण्याची आपली जबाबदारी राहील, असे यावेळी त्यांनी आश्वासन दिले.प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, किरण कांबळे यांनी समाजकल्याण सभापती म्हणून अतिशय चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला सर्वप्रकारच्या शासकीय योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळवून दिला आहे तसेच कृषी पदवीधर या नात्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावरती जावून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे व सुखाचे दिवस आणण्यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात.सर्व सामान्यांच्या सुखासाठी कार्यरत असणाºया किरण कांबळे यांनाच विधानसभेची उमेदवारी देऊन एक कार्यक्षम आमदार या रौप्यनगरीतून पाठवूया, असे आवाहन यावेळी केले. यावेळी नगराध्यक्षा जयश्री गाठ, जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडुरे, आण्णासाहेब शेंडुरे, पाणीपुरवठा सभापती सूरज बेडगे, नगरसेविका शीतल कांबळे, रमेश घोरपडे, आण्णासाहेब इंग्रोळे, नंदकुमार गोंधळी, आदी उपस्थित होते.