कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने पुकारलेला ‘वीकएंड लॉकडाऊन’ला आज, शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासूनच प्रारंभ होत आहे. तो सोमवारी सकाळी सात वाजता संपणार आहे. या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच या कालावधीत वाहने जप्तीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णत: बंद राहणार आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ब्रेक द चेन’ मोहीम अवलंबली आहे, त्याचाच एक भाग म्हणून ‘वीकएंड लॉकडाऊन’ करण्यात येत आहे. कोल्हापुरात याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात केली जाणार आहे.
पाईंटर...
- ‘वीकएंड लॉकडाऊन’ वेळ : शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७.
- पेट्रोल पंप, दवाखाने, औषध दुकानांसह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
- विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त व गुन्हे नोंदवणार
- शहरात नाकाबंदी ठिकाणे : तावडे हॉटेल, ताराराणी चौक, दसरा चौक, शिवाजी पूल, कळंबा नाका, सायबर चौक, कसबा बावडा, शिये नाका, साने गुरुजी वसाहत, आर.के.नगर.
- पोलीस : १२५ अधिकारी, १,५०० पोलीस
- होमगार्ड : ५०० होमगार्ड
- स्ट्राइकिंग फोर्स : २५ तुकड्या
- राज्य राखीव दल : २ तुकड्या