दोन आठवड्यापूर्वी या मार्गावरून जाताना येथील बाजारामुळे वाहतुकीची होणारी वाहतुकीची कोंडी तसेच, भरधाव वाहनांमुळे संभाव्य धोकाही ना. मुश्रीफ यांच्या लक्षात आला. यासाठी त्यांनी केनवडे-केनवडेकर वसाहत ते पाझर तलाव या फारशी रहदारी नसणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री सडक योजनेतून २ कोटीचा निधी मंजूर केला.
सहा ते आठ गावांसाठी उपयुक्त बाजारपेठ आहे. रुंदीकरणामुळे या ठिकाणी प्रशस्त जागा उपलब्ध झाल्याने विक्रेत्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यासाठी सरपंच अनुराधा शशिकांत शिंदे, माजी सरपंच दत्ता पाटील, उपसरपंच तुकाराम मगदूम, ग्रामसेवक विष्णू पाटील तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
"ना. मुश्रीफ यांच्या निधीतून येथील बाजारपेठ विस्तारित करणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय अध्यक्ष के. पी. पाटील तसेच, पणन व नाबार्डच्या सहकार्याने बाजार ओठे, सीसीटीव्ही, विद्युतीकरण करू. सर्वांसाठी स्वच्छतागृहे, मुबलक पाण्याची उपलब्धताही करणार आहोत.
दत्ता पाटील-केनवडेकर
माजी सरपंच