लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत कमी करण्याचा आदेश द्यावा. तसेच सध्या ७० किलोंपेक्षा अधिक गाठीचे वजन असून, ते कमी करावे, अशा मागणीचे निवेदन टेम्पोचालक-मालक कल्याणकारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.
निवेदनात, शहरामध्ये तयार होत असलेल्या पक्क्या व कच्च्या कापडाच्या गाठी उचलणारे टेम्पोधारक व माथाडी हमालधारक आहेत. शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीने ५० किलो वजन उचलण्याचा अध्यादेश आहे. मात्र, तरीही ट्रान्स्पोर्टधारक हे व्यापारी वर्ग टेम्पोधारक व माथाडी हमाल यांचा कोणताही विचार न करता ७० ते ७५ किलोंपर्यंतच्या गाठी उचलण्यास भाग पाडतात. तसेच ट्रान्स्पोर्टधारकास बळजबरीने किंवा जादा पैसे देण्याच्या नावाखाली ८० ते ११० पुढे किलोंपर्यंतच्या गाठी शिवून पाठवितात. तरी कापडाच्या गाठीचे वजन कमी करून आम्हास सहकार्य करावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू, सचिन जाधव, इसाक आवळे, साताप्पा आदमापुरे, प्रभू काकणकी, अब्राहम भोसले, आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
२३०९२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत करावे, अशा मागणीचे निवेदन टेम्पोचालक-मालक कल्याणकारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.