बोरवडे : बिद्री मौनीनगर (ता. कागल) येथील अवधूत निवास घोरपडे याने अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग प्रकारात चार पदके मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. या यशाबद्दल शुक्रवारी त्याची बिद्री साखर कारखाना कार्यस्थळावर उघड्या जीपमधून मिरवणूक काढली.अवधूत याने अमेरिकेत झालेल्या स्पेशल पॉवरलिफ्टिंग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक, दोन रौप्यपदक व एक कांस्यपदक, अशी चार पदके मिळवली. या यशाबद्दल बिद्री-बोरवडे येथील ग्रामस्थांनी त्याची मिरवणूक काढली. बोरवडे विद्यालय व भारतमाता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात दूधगंगा नदीपासून बिद्री गावात अशी तब्बल पाच तास मिरवणूक काढली.यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे यांच्या हस्ते त्याला शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. राम पाटील, डॉ. के. डी. फराकटे, राजेंद्र वारके, निवास घोरपडे, अशोक परीट, प्रवीण पाटील, पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुंभार, तानाजी साठे, नंदू पाटील, संदेश पाटील, जयवंत कांबळे यांच्यासह बिद्री-बोरवडे परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.
अवधूत घोरपडे याचे जल्लोषी स्वागत
By admin | Published: August 07, 2015 11:51 PM