शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

भारत-स्वित्झर्लंड मैत्रीसंबंधांना चालना ‘फ्रेंडशिप बस’चे स्वागत : हैदी चित्रपटाचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:13 AM

कोल्हापूर : भारत आणि स्वित्झर्लंडमधील मैत्रीपूर्ण कराराला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत दौऱ्यावर निघालेल्या ‘फ्रेंडशिप बस’चे शुक्रवारी कोल्हापुरात उत्साही स्वागत झाले.

कोल्हापूर : भारत आणि स्वित्झर्लंडमधील मैत्रीपूर्ण कराराला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारत दौऱ्यावर निघालेल्या ‘फ्रेंडशिप बस’चे शुक्रवारी कोल्हापुरात उत्साही स्वागत झाले. यावेळी दाखविण्यात आलेल्या ‘हैदी’ या स्विस चित्रपटाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संवादात्मक कार्यक्रमातून दोन्ही देशांमधील संस्कृतीची देवाणघेवाण झाली.भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये मैत्रीपूर्ण करार झाले. दोन्ही देशांच्या या ७० वर्षांच्या मैत्री वर्षानिमित्त होणाºया सांस्कृतिक उपक्रमांच्या देवाणघेवाणीअंतर्गत स्विस वकिलातीची एक विशेष ‘फ्रेंडशिप बस’ कोल्हापुरात आली. या मैत्रीपर्व उपक्रमांतर्गत स्वित्झर्लंडची भारतातील वकिलात आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे राम गणेश गडकरी हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक विजय अय्यर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे प्रभाकर हेरवाडे, फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, दिलीप बापट उपस्थित होते.यानंतर स्वित्झर्लंडचा ‘हैदी’ हा अलायन स्पोनर दिग्दर्शित चित्रपट दाखविण्यात आला. बकºयांचे कळप पाळत आजोबांबरोबर डोंगराळ भागात राहणाºया छोट्या मुलीच्या भावविश्वावर बेतलेल्या या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. चित्रपट दाखविल्यानंतर विजय अय्यर यांनी चित्रपट आणि एकूणच भारत-स्वित्झर्लंड मैत्रीसंबंधांवर रसिकांशी संवाद साधला. ‘फ्रेंडशिप बस’ने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, किशनगड, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, नाशिक व मुंबईला भेट दिली आहे. कोल्हापूरनंतर ही बस आता बेळगाव, कर्नाटक, गोवा, बंगलोरमध्ये जाणार आहे.——————————फोटो स्वतंत्र—————-इंदूमती——————-भारत-स्वीत्झर्लंड मैत्रीसंबंधांना चालना देण्यासाठी भारत दौºयावर निघालेल्या फ्रेंडशीप बसचे शुक्रवारी कोल्हापुरात आगमन झाले. यावेळी रसिकांनी स्वीस चित्रपटाच्या पोस्टरसमोर छायाचित्र घेत हा क्षण टिपला.