बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी अनेक वाहने कोगनोळीतून धोकादायक प्रवास करतात. या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून कोगनोळीकर आक्रमक झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज टोल चुकवून गावातून प्रवास करणाऱ्या वाहनांचे गुलाब पुष्प देऊन उपरोधिक स्वागत करण्यात आले.कोगनोळीतून होणाऱ्या अवैध वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन यावर तोडगा न काढल्यास महामार्ग रोखणार असल्याचे कळवले होते. त्यांनी दहा दिवसात कोणतीही कार्यवाही न केल्याने सहा फेब्रुवारी रोजी महामार्ग रोखण्याचा निर्धार कोगनोळीकरांनी केला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोल चुकवून गावातून प्रवास करणाऱ्या वाहनांचे गुलाब पुष्प देऊन उपरोधिक स्वागत करण्यात आले तसेच वाहनांवर स्टिकरही लावण्यात आले.यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळू कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, ग्रामपंचायतीचे सर्व नूतन सदस्य तसेच गावातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.वाहनांना लावले स्टीकर"गाडी माझी लाखाची, टोल चुकविण्यासाठी रस्ता शोधतो चोरीची" अशा आशयाचे स्टिकर यावेळी अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले.