कोल्हापूर : मरुधररत्न परमपूज्य आचार्य श्री रत्नाकर सुरीश्वरजी महाराज व साधू भगवंतांचे कोल्हापुरात आगमन झाले. यानिमित्त प्रतिभानगरमधील रेड्याची टक्कर येथे त्यांचे धार्मिक पद्धतीने स्वागत करून त्यांची पालखीमधून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेचे विसर्जन श्री शंखेश्वर पार्श्वनाथ गृहमंदिर येथे झाले. त्यानंतर पार्श्वनाथ भगवान यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर महाराजांनी ऐतिहासिक धार्मिक प्रसंगांची उदाहरणे देत जैन धर्माच्या तत्वांचे अनुकरण करून आत्मशांती प्राप्त करावी व सर्वांच्या कल्याणाकरिता कार्यरत राहावे, असे सांगितले.
अढार अभिषेकसह सत्तर भेदी पूजा करण्यात आली. महापौर सूरमंजिरी लाटकर व हुपरीच्या नगराध्यक्ष जयश्री गाठ उपस्थित होत्या. सायंकाळी मंदिरामध्ये पुष्परचना, आकर्षक रांगोळी व नेत्रदीपक दीपोत्सवासह सजावट करण्यात आली होती.यावेळी जयेश ओसवाल, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, कांतीलाल ओसवाल, भरत बागरेचा, विनोद चौहान, जयंत ओसवाल, प्रकाश संघवी, अमित ओसवाल, सुमित ओसवाल, राजू लाटकर, महावीर गाठ, जितूभाई शहा यांच्यासह सर्व मंदिरांचे अध्यक्ष, ट्रस्टी व सभासद उपस्थित होते.