कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आज ३१ डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप व नुतन वर्षाचे स्वागत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केले.आज नागरिकांनी तलाव, उद्याने, नदीघाट अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष द्यावे. विशेषत: रंकाळा तलाव, कळंबा तलाव, नदी घाट परिसर, उद्याने याठिकाणी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर जाणे टाळावे.
नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणतेही धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेवू नयेत तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. फाटाक्यांची आतषबाजी करु नये. तसेच प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.