कोल्हापूर : राज्य सरकारने अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम १ जानेवारी ते ३१ एप्रिलअखेर सुरू केली होती. ही सर्वसामान्यांना जाचक असणाऱ्या या मोहिमेस रेशन संघटनेने विरोध केला होता. त्याची दखल घेत ही मोहीम अखेर सरकारने स्थगित केली.
ही मोहीम सर्वसामान्यांना रेशनपासून वंचित ठेवणारी होती. गॅस असल्यास शिधापत्रिका रद्द, एकाच पत्यावर दोन शिधापत्रिका, ग्रामीण भागातील दूध व्यावसायिक असेल तर शिधापत्रिका रद्द अशी नियमावली करण्यात आली होती. त्यामुळे रेशन संघटनेने विरोध केला होता. यातील जाचक अटी रद्द करण्याती मागणी होती. त्याची दखल घेत शासनाने या मोहिमेस स्थगिती दिली. या निर्णयाचे स्वागत कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले. हा निर्णय दिलासा देणारा आहे. याचा लाभ साडेपाच लाख रेशन कार्डधारकांना होणार आहे.