कोल्हापूर : विधायक उपक्रमांचे आयोजन करीत करवीरकरांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. एकमेकांना २०२१ सालच्या शुभेच्छा देण्यातच शुक्रवारचा दिवस सरला.
शुभेच्छा देतानाच पुन्हा कोरोनासारखे संकट येऊ नये, अशीही इच्छा व्यक्त केली जात होती. अनेकांनी एकत्र येत, एकमेकांना शुभेच्छा दिल्या; तसेच शहरात विविध उपक्रमही आयोजित करण्यात आले होते. दक्षता समितीतर्फे व्यसनमुक्ती आणि पर्यावरण वर्तणुकीबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. भवानी मंडप येथे झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी प्रतिज्ञा दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, बृहस्पती शिंदे, सुधीर हंजे, लतीफ शेख, अजय अकोळकर, शामराव कांबळे, दिलीप म्हेतर उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यापीठ हायस्कूल, इंदूमती गर्ल्स हायस्कूल, डी. डी. शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकांसह उपस्थित होते. वैनायकी कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, विश्वश्री पाटील यांनी परिश्रम घेतले.
सिटीझन फोरमतर्फे ‘रन फॉर पीस’चे आयोजन करण्यात आले. यावेळी चर्च, मंदिर, मस्जिद येथे विश्वशांतीची प्रार्थना करण्यात आली. यामध्ये अठरापगड जातींचे लोक सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रसाद जाधव, अतुल रुकडीकर, फारूख कुरेशी, डॅनियल धनवडे, संदीप थोरात, विवेक रणनवरे, प्रकाश सरनाईक, दिलीप देसाई, अभय वेंगुर्लेकर, रवी जानकर, नासीर पठाण, अशोक रामचंदाणी, किशोर घाटगे, नंदू यादव, संग्राम पाटील, अजित नलवडे उपस्थित होते.
चौकट
अनेकांचे अनेक संकल्प
नववर्षाच्या निमित्ताने अनेकांनी विविध संकल्प केले आहेत. सकाळी लवकर उठून फिरायला जाणे, वजन कमी करणे, व्यायाम करणे इथपासून चहा सोडणे, गोड खाणे कमी करणे असे संकल्प केले आहेत. त्यांचीही चर्चा ठिकठिकाणी होताना दिसत होती.
०१०१२०२१ कोल न्यू इअर ०१
कोल्हापुरातील जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने शुक्रवारी नववर्षानिमित्त भवानी मंडप येथे व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.
(छाया : नसीर अत्तार)