गडहिंग्लज : बांधकाम कामगारांप्रमाणेच अन्य क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठीही विविध कल्याणकारी योजना राबविणार आहे, अशी माहिती ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
गडहिंग्लज येथे बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी चंदगडचे आमदार राजेश पाटील होते. अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांची उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले, बांधकाम कामगारांच्या नोंदणीची सोय तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.त्यात परप्रांतांतील कामगारांचीही नोंदणी केली जाईल. तसेच शेष निधीतून कामगारांच्या हिताची योजना राबविल्या जातील. पाटील म्हणाले,मंत्री मुश्रीफ यांनी अनेक नवनवीन योजना राबवून सर्व स्तरातील घटकांना न्याय दिला आहे.त्यामुळे तेच खरे लोकनेते आहेत.यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे, माजी जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर, आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनिल शिंत्रे, बसवराज आजरी, नगरसेवक हारूण सय्यद, दीपक कुराडे,रेश्मा कांबळे,शुभदा पाटील, सावित्री पाटील, गुंड्या पाटील, उदय परीट,विरुपाक्ष पाटणे, वसंत धुरे, भास्कर पाटील, रमेश देसाई आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी प्रास्ताविक केले. आशपाक मकानदार यांनी सुत्रसंचलन केले. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष महेश सलवादे यांनी आभार मानले.न आटणारा समुद्र...!१० लाखावरील बांधकामातून गोळा झालेला शेष निधी तब्बल ११०० कोटींवर पोहचला आहे. त्यामूळे हा निधी म्हणजे न आटणारा समुद्र असून तो केवळ तिजोरीत न ठेवता त्यातून कामगारांचे कोटकल्याण करण्यात येईल असेही मुश्रीफांनी यावेळी सांगितले.