शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

टँकरने भरली जाणारी विहीर आता तुडुंब...

By admin | Published: August 07, 2016 12:21 AM

वेळूची टँकरमुक्तीकडे वाटचाल : गावाच्या शिवारात पाणी खेळू लागले; जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात

सातारा : टंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये टँकर ओतून याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असे. तीच विहीर आज गावात झालेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान अंतर्गत कामांमुळे तुडुंब भरली आहे. वेळूच्या शिवारात जागोजागी पाणी खेळले आहे. सध्या सुरू असणाऱ्या पाझर तलाव जोड प्रकल्पाने गाव निश्चितच टँकरमुक्त झाले आहे. अवघ्या १५११ लोकसंख्येचे वेळू हे गाव. या गावामध्ये राज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान अंतर्गत आणि श्रमदानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या गावात ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धाही घेण्यात आली. ४४५ कुटुंब संख्या असणाऱ्या या गावात ३११ शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. मनुष्यबळाद्वारे ९२४.३१ घनमीटर सीसीटीचे काम तर १७ हजार ६७० घनमीटर डीपसीसीटीचे काम यंत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ६ गॅबियन बंधारे, २९ माती नालाबांध, कंपार्टमेंट बंडिंग त्याचबरोबर खोलीकरण, रुंदीकरण, पाणीसाठा गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आणि शेततळी यांचा यामध्ये समावेश आहे. गावातील सार्वजनिक विहिरीत टँकर ओतून गावाला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या गावात झालेल्या कामांमुळे काही दिवसांपूर्वी कोरड्या असणाऱ्या या विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. गावची टंचाई कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी यांत्रिकी विभागामार्फत तलाव जोड प्रकल्प राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)गावामध्ये ४ पाझर तलावगावामध्ये ४ पाझर तलाव आहेत. यामधील बेलेवाडीमध्ये असणारा पाझर तलाव हा वरच्या बाजूला आहे आणि तो नेहमी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असतो. सध्या जलरोधी चर काढून या पाझर तलावांमधील गळती रोखण्यात आली आहे. त्याचबरोबर तलावातील गाळही काढण्यात आला आहे. या कामांमुळे आणि झालेल्या पावसांमुळे सध्या या तलावामध्ये समाधानकारक पाण्याची पातळी झाली आहे. बेलेवाडीतून ओसंडून वाहणारे अतिरिक्त पाणी खाली असणाऱ्या पाझर तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यासाठी ७५० मीटर पाईपद्वारे हे दोन्ही पाझर तलाव जोडण्यात येत आहेत, अशी माहिती यंत्रिकी विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रकाश भोसले यांनी दिली.