चौकट : पैसे वसूल होणार का?
गुंतवणूकदारांनी सराफ पोवाळकरकडे १ लाखापासून ते ५२ लाखांपर्यंत रोख रक्कम व्याजाने गुंतवली होती. काहींनी आपले सोने ठेवून सुवर्ण कर्ज घेतले होते. तर काहींनी सुवर्ण बचत भिशीमध्ये पैसे गुंतवले होते. हे पैसे गुंतवणूकदारांना मुद्दल तरी मिळणार का? की सराफ हात झटकणार याकडे लक्ष लागून रहिले आहे. सराफ पोवाळकरकडे गुंतवणूक करणाऱ्यांत जसे शेतमजूर कष्टकरी आहेत तसे शिक्षक, सावकार, व्यापारी, बँक कर्मचारी आहेत. यातील काहींनी व्याजाच्या हव्यासापोटी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम ठेवली आहे. दागिने, घर व जमीन विक्री करून मिळालेले पैसे सराफाकडे गुंतवले आहेत.
कोट :
आम्ही भविष्यासाठी चार पैसे संसारातील शिल्लक ठेवून पोवाळकरकडे भिशी केली होती. पण तोच फरार झाल्याने बचतीवर डल्ला पडला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पैसे वसूल करून गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा.
विनायक गुरव (बालिंगा येथील गुंतवणूकदार)