कारभार स्वच्छ आहे म्हणता मग ऊस विकास निधीवर ५७ कोटी ७७ लाख खर्च दाखवून अहवालात हीच रक्कम येणे दाखवली आहे. हा खर्च कोणावर केला आणि ही येणे बाकी कोणाकडून वसूल करणार? कर्जावरील व्याजाची रक्कम ३४ कोटी असताना व्याजामध्ये १४ कोटी दाखविले आहेत. तर २० कोटी रुपये डिस्टलरीच्या खाते नंबर दोनवर दाखवून हीच रक्कम येणे दाखविली आहे. अहवालात डिस्टिलरी भाडेतत्त्वावर दिली असताना त्या खात्यावर व्याजाची रक्कम का टाकली आणि ती कोणाकडून वसूल करणार? याचे उत्तर उपाध्यक्षांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. मागील अहवाल सालात या कामावर १० लाखांचा खर्च पडला होता. तर यावर्षी याच कामावर ४७ लाखांचा खर्च करून अतिरिक्त ३७ लाखांचा बोजा कारखान्यावर का टाकला, न्यायालयीन कामकाजासाठी तीस लाखाचा खर्च करून किती न्यायप्रविष्ट वाद निकालात काढले. असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले. या पत्रकार बैठकीस रावासो डोंगळे, सात्तापा पाटील,अण्णाप्पा चौगले, रंगराव पाटील, तुकाराम सुतार उपस्थित होते.
भोगावतीच्या ऐंशी कोटी रुपये हिशोबाचे गौडबंगाल काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:23 AM