जहाँगीर शेखकागल: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना काळातही चांगले काम करीत होते. शिक्षण क्षेत्राबद्दलही चांगले निर्णय घेतले. पण एकनाथ शिंदेच्या मनात काय तरी आले आणि बदल झाला अन् राज्यात सत्तांतर झाल्याचे मत विरोधी पक्ष नेते नामदार अजित पवार यांनी व्यक्त केले.कागल येथील डी.आर.माने महाविद्यालयात खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतुन उभारण्यात आलेल्या कै. वाय डी माने सभागृहाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, भय्या माने, नवीद मुश्रीफ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, पुनर्जन्म ही थाप आहे. जे काय करायचे ते याच जन्मात करायचे. हे लक्षात ठेवुन विद्यार्थ्यांनी चांगले प्रयत्न करावेत. साधु संताचे विचार डोक्यात ठेवावेत. अंधश्रध्देच्या आहरी जाऊ नये. आई-वडीलांचे कष्ट विसरू नये. चांगले मित्र करा. वाईट मित्रामुळे बरबादीही होवू शकते असा सल्ला ही यावेळी विद्यार्थ्यांना दिलाय आम्ही सर्वजण मुश्रीफांच्या पाठीशी - सतेज पाटीलआमदार सतेज पाटील म्हणाले, हसन मुश्रीफ हे कोल्हापुर जिल्ह्याचे श्रावणबाळ आहेत. कोणत्याही संकटाला ते घाबरणार नाहीत. सर्व संकटावर हा वाघ मात करेल. जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील गोरगरीब रूग्णांच्यावर मोफत शस्त्रक्रिया उपचार करून आणण्याचे काम ते गेली अनेक वर्षे करीत आहेत. याची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. जिल्ह्यातील जनता आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे सांगत सतेज पाटील यांनी मुश्रीफांना पाठबळ दिले.
एकनाथ शिंदेंच्या मनात काय आलं अन् बदल झाला - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 6:14 PM