शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय?, उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 1:35 PM

एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड, यासोबतच सरकारी वैद्यकीय सेवेत होत असलेला बेजबाबदारपणा आणि याच अनुषंगाने नागरिकांचा व्यक्त होत असलेला संताप, यामुळे बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही.

ठळक मुद्देबेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय?उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी

बेळगाव- एकीकडे दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा विळखा तर दुसऱ्या बाजूला रुग्णांच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड, यासोबतच सरकारी वैद्यकीय सेवेत होत असलेला बेजबाबदारपणा आणि याच अनुषंगाने नागरिकांचा व्यक्त होत असलेला संताप, यामुळे बेळगावमध्ये नेमकं चाललंय तरी काय याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही.मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या हाहाकारामुळे प्रत्येकाला एका तणावपूर्ण वातावरणातून जावे लागत आहे. त्यात कोरोनावरील लस किंवा औषध अजूनही उपलब्ध झाले नसून वैद्यकीय सेवेची वानवा झाली आहे. उपचाराअंती कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील समाधानकारक असली तरीही अनेक रुग्ण उपचाराअभावी फरफटत आहेत. आणि उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.घी गल्ली येथील एका 55 वषीय रहिवाशाला श्वसनाचा त्रास जाणवल्याने 19 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बिम्स प्रशासनाने सर्जिकल ब्लॉकमधील क्वारंटाईनमध्ये त्याला ठेवले होते. बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात हलविण्यात आले.

या वॉर्डमध्ये हलविल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. अशातच रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीय व नातेवाईकांनी बीम्स परिसरात तुफान दगडफेक करीत रुग्णवाहिका पेटविली. वॉर्डमधील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ल्याचाही प्रयत्न केला. बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळ स्टाफने धरणे आंदोलन सुरू केले. बीम्स कॉलेज व सिव्हिल इस्पितळामधील सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी यात सहभाग घेतला आहे.या सर्व गोष्टींचा विचार करता नागरिक, प्रशासन, प्रशासकीय व्यवस्था, वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्यात एकमेकात कोणताच ताळमेळ नसल्याचे जाणवते. या एकंदर परिस्थितीवरून एकवेळ कोरोना परवडला परंतु अशा घटनांमुळे होत असलेली घालमेल आणि ससेहोलपट नक्कीच महागात पडेल, हे नक्की.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक