'लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही',२ हजारांच्या नोटेवर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 01:43 PM2023-05-20T13:43:40+5:302023-05-20T14:31:50+5:30

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.

What is the reason for demonetization of two thousand rupees? Ajit Pawar's question | 'लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही',२ हजारांच्या नोटेवर प्रतिक्रिया

'लोकांना फार त्रास होईल असं वाटत नाही',२ हजारांच्या नोटेवर प्रतिक्रिया

googlenewsNext

शुक्रवारी (१९ मे) संध्याकाळी धक्कादायक निर्णय घेत आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध मानल्या जातील, असे आरबीआयने म्हटले आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर आरोप-प्रत्योराप सुरू झाले. यामध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.

Karnataka Swearing-in Ceremony: सिद्धरामय्या अन् डी. के. शिवकुमार यांनी घेतली शपथ; देशभरातील अनेक दिग्गजांची उपस्थिती

अजित पवार म्हणाले, दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई दरम्यान बंद झाल्या , पण याबद्दल त्याचे कारण आणि अधिकार  शकेल. पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले, या नोटाबंदी मधून काळा पैसा बाहेर येईल आणि खोट्या नोटांना आळा बसेल असे सर्वसामान्यांना वाटले होते, त्यामुळे त्यांनी ते सहन केले.

"दोन हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला. तीन महिन्यात या नोटा बंद होणार आहे. लोकांना फार त्रास होईल असे वाटत नाही. अनेक महिने दोन हजार रुपयांच्या नोटा छपाई दरम्यान बंद झाल्या होत्या, पण याबद्दल त्याचे कारण आणि अधिकार आरबीआय सांगू शकेल का ?, असा सवालही अजत पवार यांनी केला.

भाजपात अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत, मात्र असे दावे अनेक वर्ष करण्यात येत आहे. ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील त्यावेळेस या दाव्यांना महत्त्व ठरेल. महागाई , बेरोजगारी,  शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत, असंही अजित पवार म्हणाले. अशा पद्धतीने बातम्या देऊन ते नेमके काय साध्य करतात, हे अजून पर्यंत कळलेले नाही. अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का, सिलेंडरच्या किमती कमी होणार आहेत का, असा सवालही अजित पवार यांनी केला. तरुणांना रोजगार मिळणार आहेत का ? ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर एक जरब बसविले पाहिजे, असंही पवार म्हणाले.

Web Title: What is the reason for demonetization of two thousand rupees? Ajit Pawar's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.