शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बावड्यात बंदी घालण्याचा ह्यांना कोणता अधिकार? महादेवराव महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:49 AM

कोल्हापूर : ‘ज्या जिल्ह्याच्या राजकारणात गेली पंचवीस वर्षे सत्तेची पदे वाटली, त्या जिल्ह्यातील कसबा बावड्यात मला बंदी घालण्याचा ह्यांना कोणी अधिकार दिला?’ असा सवाल करीत कार्यकर्त्यांना पाठवून लढण्यापेक्षा स्वत: समोर येऊ लढा, असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी रात्री येथे बोलताना दिला. लोकसभेचा बिगुल वाजायला लागलाय. लोकसभेचा हा ...

ठळक मुद्देशिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणातसम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेतमाझ्या तळहातावर विचित्र रेषा

कोल्हापूर : ‘ज्या जिल्ह्याच्या राजकारणात गेली पंचवीस वर्षे सत्तेची पदे वाटली, त्या जिल्ह्यातील कसबा बावड्यात मला बंदी घालण्याचा ह्यांना कोणी अधिकार दिला?’ असा सवाल करीत कार्यकर्त्यांना पाठवून लढण्यापेक्षा स्वत: समोर येऊ लढा, असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी रात्री येथे बोलताना दिला. लोकसभेचा बिगुल वाजायला लागलाय. लोकसभेचा हा अश्वमेध मी धनंजयच्या हाती देतोय. जर हिंमत असेल तर या अश्वमेधाचा लगाम धरून दाखवा, असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

कोल्हापुरातील शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या २१ फुटी महागणपतीच्या मूर्तीचे अनावरण महाडिक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रीतिरिवाजाप्रमाणे या कार्यक्रमात अनेक वक्त्यांची भाषणे होतात. मात्र, शुक्रवारी महादेवराव महाडिक यांनी व्यासपीठावर येताच थेट माईकचा ताबा घेतला आणि भाषणाला सुरुवात केली. त्यांचा सगळा रोष आमदार सतेज पाटील यांच्यावर होता; परंतु त्यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले.

सांगलीहून कोल्हापुरात २५ वर्षांपूर्वी आलो तेव्हापासून महाडिक परिवाराला येथील जनतेने मोठे केले. त्याच्या परतफेडीसाठी अनेकांना सत्तेची पदे दिली. त्याच जिल्ह्यातील कसबा बावड्यात मला बंदी घातल्याचे समजले. ज्यांनी बंदी घालायला सांगितले, त्यांनाच विचारणा करण्यासाठी मी सकाळी थेट त्यांच्याच (सतेज पाटील) दारात गेलो. कार्यकर्त्यांना घेऊन लढू नका; थेट माझ्याशीच लढा, असे सांगायचं होतं; पण त्यांची भेट झाली नाही. नंतर विश्वास नेजदार यांच्या घरी गेलो. तुम्हाला कोणी पत्रक काढायला लावले, याची विचारणा केली. त्या ठिकाणी ‘गोकुळ’च्या सभेचा विषय निघाला. राजकारणाला एक चांगली दिशा मिळेल, या हेतूने मी दिलगिरी व्यक्त करण्यास तेथे गेलो. त्यामध्ये कोणताही हेतू नव्हता, असे महाडिक म्हणाले.कसबा बावड्यातील नव्वद टक्के लोक माझ्यावर प्रेम करणारे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत पन्नास टक्के मतदान आपण घेऊन दाखविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.माझ्या तळहातावर विचित्र रेषामहाडिकांच्या तळहातावर विचित्र रेषा आहेत. काही रेषा दक्षिण-उत्तर दिसतात; तर काही पूर्व-पश्चिम दिसतात. त्या रेषा माझ्या मुठीत आहेत. दुसºया कुणाच्या आवाक्यात नाहीत. महाडिक वेगळे रसायन आहे. कोणाला सोसणारं नाही. आम्ही जाणीवपूर्वक कोणाला त्रास देत नाही. म्हणूनच आमचं रसायन आणि रेषा शोधण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.झोपलेल्या वाघावर गोळ्या झाडत नाहीमहाडिकांना वाघ उठवून त्याची शिकार करण्याची सवय आहे. झोपलेल्या वाघावर कधी गोळ्या झाडलेल्या नाहीत. दक्षिणेकडील युद्धाचे परिणाम चांगलेच पाहायला मिळतील. त्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही, असे महाडिक यांनी सांगितले. मी भाजपला पाठिंबा दिला, जिल्ह्यात मोठं केलं, हे सत्य आहे. गणपतीनेच तशी बुद्धी दिली.शिराळ्यातून सम्राट महाडिक रिंगणातयेत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही महाडिक यांनी यावेळी सांगितले.

सम्राट हे महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेतसम्राट हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर असतानाच महाडिक यांनी भाजपच्या विद्यमान आमदाराच्या विरोधात लढणाºया उमेदवारीची घोषणा करून खळबळ उडवून दिली. या मतदारसंघाचे सध्या भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक हे प्रतिनिधित्व करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघातून मानसिंगराव नाईक हे उमेदवार असतील. काँग्रेसकडून सत्यजित देशमुख यांचे नाव चर्चेत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण