शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पाचचे पाच हजार होणार नाही, याची खात्री काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 1:00 AM

कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटनंतर कार्यक्षेत्राबाहेरील केवळ पाचच सभासद करणार असल्याचे सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक सांगत आहेत; पण पाचचे पाच हजार होणार नाहीत, याची खात्री कोण देणार? असा सवाल करीत या मंडळींचे हात दगडाखाली सापडल्याने त्यांची फेकाफेकी सुरू आहे. महाडिक यांनी अशा प्रकारची धूळफेक बंद करावी, अशी माहिती ‘गोकुळ बचाव ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटनंतर कार्यक्षेत्राबाहेरील केवळ पाचच सभासद करणार असल्याचे सत्तारूढ गटाचे नेते महादेवराव महाडिक सांगत आहेत; पण पाचचे पाच हजार होणार नाहीत, याची खात्री कोण देणार? असा सवाल करीत या मंडळींचे हात दगडाखाली सापडल्याने त्यांची फेकाफेकी सुरू आहे. महाडिक यांनी अशा प्रकारची धूळफेक बंद करावी, अशी माहिती ‘गोकुळ बचाव कृती समिती’च्या वतीने पत्रकातून दिली आहे.‘मल्टिस्टेट’मुळे दूध उत्पादकांपेक्षा एका व्यापाऱ्याचा फायदा होणार आहे, तरीही हा निर्णय कसा फायदेशीर आहे, हे पटवून सांगण्याची केविलवाणी धडपड नेते करीत आहेत. कार्यक्षेत्र वाढल्यानंतर तेथील दूध संस्थांना सर्व सोई-सुविधा देणे कायद्याने बंधनकारक होणार आहे. त्याचा भार कोल्हापुरातील संस्थांना सहन करावा लागणार आहे. ‘दौलत’मधील चुकीच्या कारभारावरून संचालक मंडळ बरखास्त करावे व कारभाराची चौकशी करण्याची मागणी स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांनी केंद्र सरकारकडे अनेक वेळा केली होती. या मागणीची साधी दखलही केंद्राने घेतली नाही. मग जिल्ह्णातील दूध संस्थांचे ऐकून कोण घेणार? सभासदांचा आवाज दडपण्यासाठी ‘मल्टिस्टेट’चा घाट आहे. त्याचबरोबर सध्या बाहेरून दूध घेतल्याने कोट्यवधींचा तोटा होतो; मग मल्टिस्टेटचा अट्टहास का? असा सवालही बचाव कृती समितीचे किशोर पाटील, किरणसिंह पाटील, बाबासाहेब चौगुले, आदींनी केला आहे.'अमूल'मध्ये पाकीट संस्कृती नाही‘गोकुळ’ मल्टिनॅशनल करण्याची भाषा करणारे धनंजय महाडिक यांनी आपण मल्टिनॅशनल नव्हे, तर कोल्हापूरचे खासदार आहोत याची जाणीव ठेवावी. ‘गोकुळ’ वाढला पाहिजे, त्याची उत्पादने परदेशात गेली पाहिजेत; पण खासदारसाहेब, संघच परदेशी करू नका. ‘अमूल’ची तुलना करता; तिथे संचालकांना फिरण्यासाठी स्कॉर्पिओ गाड्या नाहीत, तिथे पाकीट व कमिशन संस्कृती नाही. त्याचबरोबर लोण्याचे कॉँट्रॅक्ट घेणारा नेता ‘अमूल’मध्ये नाही. वासाचे दूध काढून त्याचे लोणी कोणी लाटत नाही, हेसुद्धा खासदार महाडिक यांनी जाणून घ्यावे, असेही पत्रकात म्हटले आहे.