कोल्हापूर : गेले वर्षभर सातत्याने चढे दर असलेले गहू व तांदळाने या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. दर किमान ५ ते १० रुपयांनी कमी झाले आहेत. नवीन कांदा व बटाट्याची आवक सुरु झाल्याने दरही ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गाजर, काकडीची आवक सुरु झाली असून, दर अजूनही ६० ते ७० रुपये किलो असे चढेच आहेत. हरभरा डहाळ्यांची आवक सुरु झाली असून, दहा रुपयांना दोन असा पेंढीचा दर आहे.
लक्ष्मीपुरी बाजारात रविवारी नेहमीप्रमाणे फळे आणि भाज्यांच्या दरातील निचांक दिसत आहे. मेथी, शेपू, पालक, पोकळा १० ते १५ रुपयांना दाेन असा दर कायम आहे. कोथिंबीरचीही तशीच परिस्थिती आहे. टोमॅटोच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी वाढ होऊन किलोचा दर २० रुपये झाला आहे. आले व मिरची ४० रुपये किलो आहेत. वांगी ४० ते ५० रुपये किलो आहेत. इतर भाज्या २० ते ३० रुपये किलोवर स्थिर आहेत. कोबी, फ्लॉवर दहा रुपये गड्डा आहे. मटारची तुफान आवक असून दर ३० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. फळांमध्ये केळी २० ते ३० रुपये डझन, कवठ २५ रुपयांना एक, संत्री ३० रुपये किलो, चिकू व संत्री ४० रुपये किलो, बोर १५ ते २० रुपये किलो असा दर आहे. सफरचंद १०० ते १६० रुपये किलोचा दर आहे.
चौकट ०१
धान्यामध्ये गहू २२ ते ३० रुपये असा दर झाला आहे. मागील आठवड्यात हाच दर ३० ते ३६ रुपयांवर होता. ज्वारीच्या दरात ५ रुपयांनी घसरण झाली असली तरी अजूनही दर३५ ते ५६ रुपये किलो असे चढेच आहेत. तांदळाच्या दरात किलोमागे ८ ते १० रुपयांनी घट झाली असून, सर्वसाधारण दर २८ ते ६० रुपयांपर्यंत आहेत.
चौकट ०२
डाळी व कडधान्यांचे दर स्थिर
पिवळा वाटाणा अजूनही १६० रुपये किलोवर आहे. तूरडाळ ९२ रुपये, मटकी डाळ १२० रुपये, मूग डाळ १२० रुपये किलो आहे. हिरवा मूग ११२, चवळी ९० आहे. बेळगावी मसुरा २४० रुपये किलो आहे. नाशिक मसुरा व डाळ ६५ ते ७० रुपये किलो आहे. हरभरा डाळ ७२ रुपये किलो आहे.
फोटो: २७१२२०२०-कोल-बाजार हरभरा
फोटो ओळ: हरभरा डहाळे बाजारात दाखल होऊ लागले आहेत.
२७१२२०२०-कोल-बाजार कांदा
फोटो ओळ: बाजारात नवीन कांद्याची आवक वाढली आहे.
२७१२२०२०-कोल-बाजार गाजर
फाेटो ओळ: बाजारात गाजरांचे ढीग वाढू लागले आहेत.