शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जास्त हवा भरली की, फुगा फुटतोच: दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:10 AM

कोल्हापूर : अनाठायीपणा टाळा. बुद्धी शाबूत ठेवून विरोधकांचे गनिमी कावे ओळखून कार्यरत राहा. जास्त हवा भरली, की फुगा फुटतोच; त्यामुळे आविर्भावात राहू नका, अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथे शिवसैनिकांना दक्ष राहण्याबाबत इशारा दिला.शिवसेनेच्या कोल्हापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. येथील केशवराव भोसले नाट्यगृहातील मेळाव्यास ...

कोल्हापूर : अनाठायीपणा टाळा. बुद्धी शाबूत ठेवून विरोधकांचे गनिमी कावे ओळखून कार्यरत राहा. जास्त हवा भरली, की फुगा फुटतोच; त्यामुळे आविर्भावात राहू नका, अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथे शिवसैनिकांना दक्ष राहण्याबाबत इशारा दिला.शिवसेनेच्या कोल्हापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. येथील केशवराव भोसले नाट्यगृहातील मेळाव्यास शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर प्रमुख उपस्थित होत्या. या मेळाव्याद्वारे आमदार क्षीरसागर यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. परिवहनमंत्री रावते म्हणाले, शिवसैनिक हा विकाऊ नव्हे, तर टिकाऊ आहे. निवडणुकांतील यश-अपयशापेक्षा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी लढा. या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातून दहा आमदार, दोन खासदार निवडून देण्यासह हॅट्ट्रिक करण्याची ग्वाही दिली. मात्र, आपण परिस्थिती समजून घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो, तरच यश मिळेल. संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, विरोधकांनी कितीही हल्ले केले, तरी शिवसेना डगमगणार नाही. कोल्हापूरमध्ये सेनेमध्ये गट-तट काही नाहीत. उपनेते बानुगडे-पाटील म्हणाले, सदासर्वकाळ राजकारण करायचे असेल, तर विचार आणि काम महत्त्वाचे आहे. आमदार क्षीरसागर म्हणाले, आंदोलनांच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळवून दिला. सध्या कोल्हापुरात दबावाचे राजकारण सुरू आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, त्याला न घाबरता मी, माझे कार्यकर्ते कोल्हापूरकरांवरील अन्यायासाठी लढा देत राहू.मेळाव्यात सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेतेपदी निवड झाल्याबद्दल मंत्री रावते यांचा आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते चांदीची तलवार देऊन सत्कार केला. वीरपत्नी हौसाबाई चौगुले, मालूबाई मगदूम, केरूबाई पाटील यांना एस.टी.च्या मोफत प्रवासाचे स्मार्टकार्ड हे मंत्री रावते यांच्या हस्ते प्रदान केले. विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या पैलवानांचा सत्कार केला. यानंतर सुनील मोदी, दीपक गौड, उदय पोवार, जितेंद्र इंगवले यांनी मनोगतातून कोल्हापुरात शिवसेनेला भरघोस यश मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी रविकिरण इंगवले, नगरसेवक नियाज खान, रघुनाथ खडके, अमर समर्थ, मंगल साळोखे, अभिजित चव्हाण, आदी उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक, अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल देवकुळे यांनी आभार मानले.आगामी निवडणुकीची लढाई सोपी नाहीसांगली निवडणुकीतील मतमोजणीच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री आपल्या ४५ जागा येणार असून महापौरपदाचे बघायला तेथे जावा, असे कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना सांगतात. त्यावरून लक्षात घ्या की, आगामी निवडणुकीची लढाई सोपी नाही, असे मंत्री रावते यांनी सांगितले. ते म्हणाले, संपर्क नेतेपदी निवड झाल्यानंतर कामाची सुरुवात करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनाने करत आहे. सन २०१९ मध्ये मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकेल.हॅट्ट्रिकसाठी मते महत्त्वाचीआमदार क्षीरसागर यांची हॅट्ट्रिक करायची, की नाही हे तुम्ही ठरवा. लोकशाही असल्याने हॅट्ट्रिक करण्यासाठी जनतेची मते महत्त्वाची आहेत. ते लक्षात घ्या, असा सल्ला मंत्री रावते यांनी क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले, टीकादेखील सकारात्मकपणे घ्या. शिवसेनाप्रमुखांनी रुजविलेले राष्ट्रीयत्व विचार कृतीतून दिसले पाहिजे.