शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

अंबाबाई मंदिर दर्शन मंडपाचा मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 4:37 PM

कोल्हापूर : जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत ७ कोटींचा निधी येऊनही अद्याप दर्शन मंडप उभारण्यात ...

ठळक मुद्देअंबाबाई मंदिर दर्शन मंडपाचा मुहूर्त कधी?शिवसेनेची विचारणा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

कोल्हापूर : जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत ७ कोटींचा निधी येऊनही अद्याप दर्शन मंडप उभारण्यात येणाऱ्या जागेचा ताकतुंबा सुरू आहे. या निधीचा वापर आपल्या मालकीसारखा व हेकेखोरपणाने न करता प्रशासनाने लक्ष घालून तातडीने दर्शन मंडप उभारावा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.निवेदनात म्हटले आहे की, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्य शासनाने अंबाबाई मंदिराचा ८६ कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केला. शिवसेनेच्या आंदोलनाने त्याला गती येऊन प्राथमिक विकासकामासाठी प्रशासनाकडे दर्शन मंडप व इतर सुविधांसाठी सात कोटींचा निधी वर्ग झाला आहे; मात्र सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व काही पदाधिकाऱ्यांमुळे दर्शन मंडपाची जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

निवडणुका तोंडावर असताना जागेचा ताकतुंबा चालू आहे. वास्तविक वार्षिक सण असो अथवा नवरात्रौत्सव या कालावधीत भाविकांना ऊन, वारा, पाऊस यांपासून कोणतेही संरक्षण नाही. लहान-थोर, वृद्ध आणि अनेकांची यात ससेहोलपट होत आहे. अब्जावधी रुपयांचे उत्पन्न असणाऱ्या समितीने यावर आजपर्यंत काहीही ठोस निर्णय घेतलेला नाही; त्यामुळे आता प्रशासनानेच या दिरंगाईच्या कामात त्वरित लक्ष घालावे व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी युद्ध पातळीवर निर्णय घेऊन दर्शन मंडपाचे काम त्वरित सुरू करावे. दरम्यान, सरलष्कर भवनशेजारील महापालिकेच्या जागेत व्यवसाय करणाºया सात दुकानदारांनी दर्शन मंडपासाठी आम्हाला हलविण्यात येऊ नये, अशी विनंती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली आहे.

जशास तसे..दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मेळाव्यात देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेने लगेच देवस्थान समितीकडील प्रलंबित कामावर बोट ठेवून जाब विचारला आहे.

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना