शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 4:16 PM

मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेतर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात भंडावून सोडले. या प्रश्नांचे नेमके उत्तर अर्ज भरून घेत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मात्र नव्हते.

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : साहेब, मॅडम, आम्ही अर्ज भरून पंधरा दिवस झाले. अजूनही ऑनलाईनवर पेंडिंग असेच दिसत आहे. पुढे काय करायचे? अनुदान मंजूर झाल्यानंतर इतर नातेवाईकांचा नाहरकत दाखल घ्यायचा का?, एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा भरता येतो का? असे प्रश्न विचारून कोरोनाने मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेतर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात भंडावून सोडले. या प्रश्नांचे नेमके उत्तर अर्ज भरून घेत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मात्र नव्हते.सरकारने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी कोरोनाने मयत झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश काढला. यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक केले आहे. अर्ज भरण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, नेट कॅफेमध्ये गेल्यानंतर १०० ते २०० रुपयांपर्यंत त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत, म्हणून महापालिकेतर्फे शुक्रवारी शहरातील चार ठिकाणी मोफत ऑनलाईन अर्ज भरून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.

सासणे ग्राऊंडजवळील निवडणूक कार्यालयातील शिबिरात भेट देऊन अर्ज भरण्यासाठी आलेल्या नातेवाईकांशी थेट संवाद साधला. त्यावेळी अनेक नातेवाईक गोंधळलेले दिसले. अर्ज भरलेल्या दहा जणांशी बोलल्यानंतर, एकाने अनुदान मिळाल्याचे सांगितले. उर्वरितांनी, पेंडिंग मॅसेज पाहूनच समाधान मानावे लागत असल्याचे स्पष्ट केले.

झेरॉक्स अपलोड केल्यास विलंबऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांचे झेरॉक्स अपलोड केल्यास त्याची पडताळणी होते. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदान मिळते. यास विलंब लागतो. एकदा अर्ज भरल्यानंतर पुन्हा भरता येत नाही. एकपेक्षा अधिक वारस असल्यास जवळचा आणि पहिला जो अर्ज भरेल, त्यांचाच अर्ज दाखल होतो. आता अनुदान जमा झालेल्यांच्या मतानुसार इतर वारसांचा नाहरकत दाखला घेण्याची गरज नाही

माझी आजी कोरोनाने मयत झाली. मी नातू म्हणून ३ डिसेंबरला अनुदानासाठी अर्ज भरला. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केली. त्यानंतर १५ डिसेंबरला माझ्या खात्यावर ५० हजारांचे अनुदान जमा झाले. - महेश कापसे, कसबा बावडा

मी माझा मित्र महेश यांच्यासोबतच ३ डिसेेंबरला ऑनलाईन अर्ज भरला आहे. अर्ज भरताना काही कागदपत्रांच्या झेरॉक्स अपलोड केल्या. मला अजूनही अनुदान मिळालेले नाही. केवळ पेंडिंग मॅसेज आला आहे. - विजय सूर्यवंशी, कसबा बावडा

वडील कोरोनाने मयत झाल्याने मी मुलगा म्हणून पंधरा दिवसांपूर्वी ऑनलाईन अर्ज भरला. त्यानंतर एकदा डाॅक्युमेंट मिसिंग असा मेसेज आला. काही दिवसांनी पेंडिंग म्हणून मेसेज आला. यासंबंधी सरकारी यंत्रणेकडे विचारणा केल्यानंतर, कोणाकडूनही नेमके उत्तर मिळत नाही. - संदीप पाटील, मडिलगे खुर्द

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या