शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जिल्हा बँकेतील अपहाराची वसुली कधी होणार?

By admin | Published: September 29, 2016 12:18 AM

२८ जणांवर जबाबदारी : कागल, गोकुळ शिरगाव, निगवे शाखांमधील कर्मचाऱ्यांकडून तीन कोटी ४६ लाखांचा अपहार

प्रकाश पाटील -- कोपार्डेकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बॅँकेमधून जिल्ह्याच्या औद्योगिक व कृषी विकासाला चालना मिळाली आहे. बॅँकेवरील विश्वासाने या बॅँकेच्या ठेवीत दरवर्षी कोट्यवधींची वाढ होते. सर्वसामान्य लोकांच्या पुंजीला संरक्षण देणे हे बॅँकेच्या कारभाराचे काम असते; पण कर्मचाऱ्यांकडून बॅँकेतील रकमेवर डल्ला मारत अपहार करणाऱ्यांना संरक्षण दिल्याचेच स्पष्ट झाले असून, अहवालात जिल्हा बॅँकेच्या तीन शाखांत झालेल्या तीन कोटी ४६ लाख रुपयांची वसुलीच झालेली नाही, हे स्पष्ट झाले आहे.काही वर्षांपूर्वी जिल्हा बॅँकेच्या कागल, गोकुळ शिरगाव व निगवे या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांकडून अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. कागल येथील दोन शाखांमध्ये दोन कोटी ८७ लाख, गोकुळ शिरगाव येथील शाखेत ६९ लाख, तर निगवे येथील शाखेत ४५ लाख रुपयांचा अपहार कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या अपहारप्रकरणी कार्यकारी संचालक दीपक चव्हाण यांच्यासह २८ कर्मचाऱ्यांवर रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. यात कागल शाखा - १ मधील कॅशिअर ए. बी. पुणेकर यांच्यावर एक कोटी ५० लाख, तर कागल शाखा-२ मधील कॅशिअर आर. एन. भुजवडकर यांच्यावर एक कोटी ५० लाख, अशी तीन लाखांची अपहारातील रकमेची जबाबदारी निश्चित केली होती. इतर कर्मचाऱ्यांकडून वसूल करावे, असा चौकशी समितीने ठपका ठेवला होता. यात कागल शाखा - २ चे कॅशिअर बी. जी. केर्ले, आर. बी. पिष्टे (लिपिक), आर. एस. करबळी (लिपिक), वाय. बी. कुंभार (लिपिक), कागल शाखा-२ चे शाखाधिकारी पी. आर. चौगले, शाहू बंडू आवळे, बी. एस. चौगले (रिसिव्हिंग कॅशिअर), बी. बी. पाटील (उपव्यवस्थापक), ए. डी. घोरपडे (उपव्यवस्थापक), आर. एल. रसाळ (उपव्यवस्थापक), एस. एस. इंदुलकर (अकौंटंट), एस. ए. जोशी (अकौंटंट), राहुल माने (लिपिक), एस. डी. माने (सब अकौंटंट), ए. ए. खोत (शाखा तपासणी अधिकारी), ए. डी. यळगावकर (मुख्य कॅशिअर), बी. जी. कल्याणकर (चीफ अकौंटंट), आर. जी. ठाणेकर (चीफ अकौंटंट), एस. व्ही. मुनीश्वर (चीफ अकौंटंट), दीपक चव्हाण (मॅनेजिंग अकौंटंट), बी. बी. बेडगे (लिपिक), एन. आय. पिरजादे (लिपिक), ए. आय. माळी या सर्व २३ जणांवर प्रत्येकी एक लाख ७७ हजार, तर गोकुळ शिरगाव शाखेतील शाखाधिकारी आर. व्ही. जाधव व एस. ए. केसरकर यांच्यावर प्रत्येकी ३९ लाख ८७ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रशासकांच्या काळानंतर आलेल्या संचालक मंडळानेही या शाखांमधील वरील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अपहार रकमेच्या वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र अहवालातील आकडेवारीतून दिसत आहे. वरील रकमेतील तीन कोटी ४६ लाख रुपये आजही वसूलपात्र असल्याची आकडेवारी आल्याने सर्वसामान्य माणसांमध्ये चिंतेची पाल चुकचुकते आहे.वसुलीला गती मिळायला हवीजिल्हा बॅँकेच्या संपूर्ण जिल्ह्यातील १९२ शाखांमध्ये आठ लाख खातेदार आहेत. यांच्यामध्ये आपल्या ठेवी बचत खाते कर्जाच्या रकमा यांच्या संरक्षणाबाबत विश्वास निर्माण करावयाचा असेल, तर या अपहारातील रकमेच्या वसुलीला गती मिळायला हवी. अन्यथा, बॅँकेचे अध्यक्ष असणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या तालुक्यातील शाखांमध्येच मोठा अपहार कर्मचाऱ्यांनी केल्याने खुद्द अध्यक्षांचे याला संरक्षण आहे, अशी शंका बळावल्याशिवाय राहणार नाही.शाखांनिहाय अपहाराची रक्कम२, ८७,00,000कागल ६९,00,000गोकुळ शिरगाव ४५,00,000निगवे