भारत चव्हाण ।कोल्हापूर : ‘लोकमत’ला मुलाखत देताना क्षीरसागर यांनी जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले. ‘जाधव यांची साडेपाचशे कोटींची उलाढाल आहे. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत; परंतु कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ती कोणाकडून पैसे घेत नाही. १९९० मध्ये सुरेश घोसाळकर यांनी पैसे वाटले. स्वाभिमानी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. जनता या दुस-या घोसाळकरलाही त्यांची जागा दाखवील. पैशांचा प्रचंड वापर करून केवळ प्रतिष्ठेसाठी निवडणूक लढविणाºया जाधव यांच्यासारख्या व्यावसायिक माणसाला जनता नक्की घरी पाठवील,’ असे क्षीरसागर म्हणाले.
‘गेल्या दहा वर्षांत आमदार म्हणून मी जनतेसोबत आहे. शहरातील लोकहिताच्या आंदोलनात मी अग्रेसर आहे. नुसती आंदोलनेच केली नाहीत, तर शहराचा टोल, एलबीटी रद्द करायला भाग पाडले. मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सोडविले. टोल रद्द करावा म्हणून विधानसभेत राजदंड पळविला. त्यासाठी मला निलंबित व्हावे लागले. माझी आमदारकी जनतेच्या सेवेसाठी असल्याची जाणीव आहे; म्हणूनच मी ३६५ दिवस जनतेची कामे करतो. त्यातूनच माझी नाळ सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे,’ असे क्षीरसागर म्हणाले.
शिवसेनेचे पदाधिकारी तुमच्या प्रचारात दिसत नाहीत, याकडे लक्ष वेधले असता क्षीरसागर यांनी सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुर्गेश लिंग्रस व कमलाकर जगदाळे यांना पक्षातून निलंबित केले. अजून दोघे-तिघेजण कारवाईच्या रांगेत आहेत. त्यांनी सुधारणा केली नाही तर त्यांचीही तशीच गत होईल; कारण उद्धव ठाकरे इथल्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
डॉक्टर लॉबीवर आपण दबाव टाकत असल्याचा रोष आहे, हे निदर्शनास आणून देताच क्षीरसागर यांनी खुलासा केला. मी १० हजारांहून अधिक गोरगरीब रुग्णांवर पुणे, मुंबईत मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्या. जीवनदायी योजनेत गरीब रुग्णांची पिळवणूक झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी छापे मारून त्यांचे पितळ उघड केले. गरिबांची लूट होणार असेल तर खपवून घ्यायचे का? अशा प्रश्नाला हात घातला की मी खंडणी मागतो, असा खोटा आरोप केला जातो. हे सर्वस्वी चुकीचे आहे.
वैद्यकीय बिलाचे भांडवल नकोवैद्यकीय बिलांच्या बाबतीत मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. माझी पत्नी गंभीर आजारी होती. उपचारांचा खर्च मोठा होता. गंभीर आजारातून पत्नीला बाहेर काढण्याचे कोणत्याही पतीचे प्रयत्न असतात. आमदार म्हणून असलेल्या अधिकारात तिच्या वैद्यकीय उपचारांचे ३२ लाख रुपये मिळाले. बिल मंजूर करणारी एक समिती असते. त्यात विधानसभेचे अध्यक्ष, प्रधान सचिव असतात, तज्ज्ञ असतात. मी सांगितले म्हणून पैसे दिले नाहीत, असा खुलासा क्षीरसागर यांनी केला. दोन-अडीच कोटींची बिले घेणाºयांवर टीका झाली नाही; पण ती माझ्यावर झाली. अशा कठीण प्रसंगाचे कोणी भांडवल करू नये, असे ते म्हणाले.‘चंद्रकांत जाधव कोण हे कॉँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यावर लोकांना कळले. मुळात हा व्यावसायिक माणूस. ते समाजसेवा कधी करणार?’ असा सवाल कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी उपस्थित केला. ‘मी जनतेचा आमदार आहे. जनतेच्या सेवेत ३६५ दिवस कार्यरत आहे आणि यापुढेही राहीन’ असा विश्वासही त्यांनी दिला.५० हजारांचे मताधिक्क्य..‘जाधव यांचे तुमच्यासमोर आव्हान आहे का?’ असे विचारता त्यांनी सांगितले की, ‘जाधव कार टू कार्पेटवाले नेते आहेत. एसीतून एसीत जातात. त्यांच्या पत्नी, भाऊ भाजपचे नगरसेवक आहेत. पैसे आहेत म्हणून केवळ प्रतिष्ठेसाठी ते निवडणूक लढवीत आहेत. मला अहंकार नाही; परंतु आत्मविश्वास आहे. मी केलेल्या कामांकडे पाहून जनता मला विजयी करील. ५० हजारांचे मताधिक्य मिळेल.’
शहरातील काही डॉक्टर प्रचंड बिल आकारतात, अशी तक्रार माझ्याकडे आली तेव्हा मी चार-पाच लाखांचे बिल दहा-वीस हजारांनी कमी करा, अशी विनंती केली, तर त्यात माझा गुन्हा काय ?