शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पेट्रोल पंप कामगारांची परवड थांबणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:54 PM

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल ...

दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल पंप असून, यामध्ये साधारणत: तीन हजार कामगार कार्यरत आहेत. पंपमालकांच्या मनमानीमुळे या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, सीटूच्या झेंड्याखाली एकसंध होत न्याय्य हक्कासाठी हे कामगार लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.२ आॅक्टोबर२०१७ ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकांनी आदेश काढून सर्व पंपमालकांना किमान वेतनाच्या सूचना दिल्या होत्या. पंपमालकांची कमिशन वाढ करताना ही अट घातली होती. मात्र, याची तंतोतंत अंमलबजावणी होताना दिसत नाही.म्हणूनच किमान वेतनला खीळ : लाल बावटाविविध कंपन्यांचे सेल्स आॅफिसर व स्थानिक पंपमालकांमध्ये सेटलमेंट होत असते. त्यामुळेच कंपनीकडून कामगारांना किमान वेतन व आठ तास कामाबाबत विचारणा होत नाही;परंतु यामध्ये कामगार भरडला जात असून, त्यांच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसत असल्याचा आरोप संघटनेचे नेते भरमा कांबळे व कॉ.चंद्रकांत यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.अशी होते पिळवणूक..!थंडी,ऊन, वारा,पाऊस यांचा विचार न करता हे कामगार पंपावर काम करतात.कामगारांकडे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल सोडण्याचे काम असले तरी वेतनाचा रिमोट कंट्रोल मालकांकडेच असतो. या कामगारांना किमान दरमहा१६हजार रुपयांपर्यंत वेतन देण्याचा कायदा आहे. मात्र,ग्रामीण भागात३ते४हजार व शहरी भागात५ते७हजारांपर्यंतच वेतन दिले जाते.त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात त्यांचे वेतन जमा करण्यात येऊ लागले; परंतु पगारात अल्पशी वाढ करून उर्वरित रक्कम बँक खात्यावरून कामगाराने काढून मालकांकडे सुपूर्द करण्याचा अलिखित नियम करून वेठीस धरले जात आहे.त्यामुळे कामगारांकडे अन्य वेतन मालकांकडे अशी स्थिती झाली आहे....अन् पहारेकऱ्यांचीही भूमिकाग्रामीण भागातील पंपांवर दोन किंवा तीनच कर्मचारी असतात.२४तास ड्यूटी असल्यामुळे रात्री-अपरात्रीही एकट्यालाच थांबावे लागते. वॉचमन नसल्यामुळे या कामगारांना पंपाचा पहारेकरी व्हावे लागते. तसेच विक्री झालेल्या पेट्रोल-डिझेलचे पैसे सकाळपर्यंत सांभाळून ठेवताना दमछाक होत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे.