शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

प्रकल्पग्रस्तांची फरपट: चांदोली प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपणार कधी? तीस वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 6:37 PM

शासन आपल्या दारी नव्हे, प्रकल्पग्रस्त शासनाच्या दारी

आर. एस. लाडआंबा : शासन आपल्या दारी अभियानातून सातबारा उतारा ते घरकुल व रोजगाराच्या वाटा पोहोचवल्या जात असताना दुसरीकडे मात्र याच योजनांसाठी पाणी आणि जंगल यांचा त्याग करणारे चांदोली प्रकल्पग्रस्त तब्बल तीस वर्षे शासनाच्या दारी ठिय्या मारून पुनर्वसनाचा हक्क मागत आहेत; पण त्यांची दखल घेण्याचे धाडस होत नाही. किती विरोधाभास आहे याची कल्पना करवत नाही अशी पोटतिडीक श्रमिक मुक्ती दलाचे संघटक मारुती पाटील यांनी मांडली.ढाकाळे, निवळे, कुल्याचीवाडी, सोनार्लीपैकी धनगरवाडा, तनाळी, चांदेल व गोठणे या सात गावांतील ग्रामस्थ १९९७ नंतर चांदोली अभयारण्यामुळे चौदा गावातून विस्थापित झालेत. यामधील ९१५ खातेदार कुटुंबांना पुनर्वसनाच्या कायद्यानुसार ९११ हेक्टर क्षेत्र पर्यायी जमीन देणे, घरबांधणी अनुदान (प्रती कुटुंब १.६५ हजार) व वाहनखर्च (५०,०००) देणे हा हक्क असताना गेल्या तीस वर्षांच्या आंदोलनानंतर केवळ ११७ हेक्टर क्षेत्र त्यांच्या पदरी पडले आहे. अद्याप सुमारे ७९५ हेक्टर क्षेत्रासह वाहन व घरबांधणी निधी मिळण्यासाठीची झुंज चालू आहे. केवळ २६३ खातेदारांना अंशता जमीन मिळाली, पण शेती पीकवायला पाणी दिले नसल्याने गेल्या तीस वर्षांपासून या प्रकल्पग्रस्तांची फरपड चालू आहे.सन १९९० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी धरण, अभयारण्य व भूकंपग्रस्त म्हणून या गावांचे खास बाब म्हणून विस्थापन जाहीर केले. १९९५ पासून शासनाच्या लालफितीत धरणग्रस्तांचे जिणे अडकून पडले आहे. दरवर्षी आंदोलन करूनही तीस वर्षांत केवळ पंधरा टक्के हक्क पदरी पडला आहे.

मायबाप कसं जगायचं : शांताबाई पवारशेती-पाण्याअभावी कमावते साधन नाही, शिक्षणाअभावी नोकरी नाही, त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. मायबाप कसं जगायचं अशी आर्त वेदना सत्तर वर्षीय शांताबाई पवार यांनी मांडली. तीस वर्षांपूर्वी जंगल सोडताना वाटलं शहरालगत जातोय, तिथं मूलभूत सुविधा देणं सरकारला बरं पडेल. मुलं शिकतील-सवरतील, नोकरीला लागतील. आम्हालाही शेत पिकवण्यास जमीन मिळेल, सरकार पाणी दिल. पण कुठं काय तवा? अधिकाऱ्यांच्या माग लागण्यापेक्षा जंगलातल्या मूळगावी परतलेलं लाखमोलाचं. मानसापरीस तिथली जनावरे बरी. हा सखुबाईचा पर्याय सुस्तावलेल्या प्रशासनाला चपराक मारून जातो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगली