शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

पूरग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे १५ कोटी कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:11 PM

पद्माळ, नावरसवाडीसह अनेक ठिकाणी पर्यायी खोल्यांत वर्ग सुरु आहेत. बहुसंख्य ठिकाणी पत्र्याच्या छताच्या खोल्यांची नासधूस झाली. तेथे नजीकच्या आरसीसी इमारतीत वर्ग भरविले जात आहेत. मौजे डिग्रजमध्ये लोकसहभागातून तीन खोल्यांची उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतात्पुरत्या उपाययोजना : दुसरा पावसाळा आला तरी दुरुस्ती नाही!

संतोष भिसे ।सांगली : गेल्यावर्षीच्या महापुरात जिल्ह्यातील १९७ शाळा इमारतींची नासधूस झाली. त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविला. पण वर्ष झाले तरी निधी मिळालेला नाही. इमारतींच्या तात्पुरत्या दुरुस्त्या करुन वर्ग भरविले जात आहेत.महापुरानंतर दुसरा पावसाळा आला तरी हा विषय दुर्लक्षित आहे. काही तालुक्यांत स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांनी खोल्या उभारुन दिल्या. पण शासनाची मदत मात्र मिळालेली नाही. वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५७ शाळांची नासधूस झाली होती. मिरज, पलूस, शिराळा आदी तालुक्यांतही इमारतींमध्ये महापुराचे पाणी घुसले. वर्गखोल्यांच्या बांधकामासह शालेय साहित्य, फर्निचर, संगणक आदींची अतोनात हानी झाली. महापूर ओसरताच ग्रामस्थांच्या मदतीतून शाळा सावरल्या, वर्ग सुरु झाले. खोल्यांची दुरुस्ती मात्र झालीच नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन पंधरा कोटींच्या दुरुस्ती खर्चाचा प्रस्ताव पाठविला. तो बासनात गेल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.पद्माळ, नावरसवाडीसह अनेक ठिकाणी पर्यायी खोल्यांत वर्ग सुरु आहेत. बहुसंख्य ठिकाणी पत्र्याच्या छताच्या खोल्यांची नासधूस झाली. तेथे नजीकच्या आरसीसी इमारतीत वर्ग भरविले जात आहेत. मौजे डिग्रजमध्ये लोकसहभागातून तीन खोल्यांची उभारणी करण्यात आली आहे.

मिरज तालुक्यात : पक्क्या इमारतीमिरज तालुक्यात पश्चिमेकडील नदीकाठच्या गावांत बहुसंख्य इमारती आरसीसी असल्याने पडझड झाली नाही. महापुरानंतर साफसफाई करुन तेथेच वर्ग सुरु झाले. सांगली शहरातही नदीकाठच्या शाळा इमारती पक्क्या बांधकामाच्या असल्याने पडझड झाली नाही.

पलूस तालुक्यातील बोरबनमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी खोल्या बांधून दिल्या. सरकारी मदत मात्र अजूनही मिळालेली नाही.

पद्माळेत पुराचे पाणी शिरल्याने प्राथमिक शाळेची अशी दुरवस्था झाली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzp schoolजिल्हा परिषद शाळाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग