कोल्हापूर : कोलकाता येथील डॉक्टर तरुणी आणि बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोल्हापुरातही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराचे ११० गुन्हे नोंद झाले, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या, त्यामुळे महिला कधी सुरक्षित होणार? असा प्रश्न उपस्थित होतो.
या गुन्ह्यांमध्ये वाढगेल्या सात महिन्यांत बलात्काराचे ११०, तर विनयभंगाचे २०५ गुन्हे दाखल झाले. १५८ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
कुटुंबातही मुली असुरक्षितअल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे बहुतांश आरोपी कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, ओळखीतील व्यक्ती असतात. अनेकदा असे गुन्हे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत. कौटुंबिक छळाच्याही घटना वाढत आहेत. कुटुंबातच मुली आणि महिला असुरक्षित असल्याने त्यांच्या सुरक्षेची सुरुवात कुटुंबापासून होणे गरजेचे आहे.
संस्कार, प्रबोधन गरजेचेमुली आणि महिलांचा आदर राखणे, त्यांचा सन्मान करण्याचे संस्कार घरातून होणे गरजेचे आहे. पालकांनी विशेष खबरदारी घेऊन मुलांची जडणघडण केल्यास अशा प्रकारचे गुन्हे कमी होऊ शकतात. शाळा आणि महाविद्यालयांनीही यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची गरज आहे. तरच ही सामाजिक समस्या कमी होऊ शकेल.निर्भया पथकांनी आक्रमक व्हावेनिर्भया पथकांकडून सध्या शाळा, महाविद्यालये आणि गर्दीच्या ठिकाणी संशयितांवर कारवाया केल्या जातात, मात्र रोडरोमियो आणि हुल्लडबाजांना धडकी भरेल अशी कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाईत सातत्य असावे. दोषींना शिक्षा झाली तरच असे गुन्हे करण्याचे धाडस कमी होईल. यासाठी ठोस कारवाया गरजेच्या आहेत.
महिलांसंबंधी गुन्ह्यांची आकडेवारीगुन्हा - दाखल - उघडखून - ८ - ८हुंड्यासाठी छळ - २० - २०बलात्कार - ११० - ११०विनयभंग - २०५ - २०५अपहरण - १५८ - १४४