शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

तयारी विधानसभेची; स्वबळा’ची चाचपणी, पण कोल्हापूर जिल्ह्यात ताकदीचे उमेदवार कुठे आहेत

By राजाराम लोंढे | Published: May 27, 2024 1:37 PM

आघाडी, महायुती एकसंध राहिल्यास काट्याची टक्कर

राजाराम लोंढेकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसायचा असताना राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपातील ताणाताणी पाहता, विधानसभा स्वबळावर लढावी का? अशी चर्चा मोठ्या पक्षांत सुरू आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार केला तर येथे बहुतांशी पक्षांकडे दहाच्या दहा मतदारसंघांत ताकदवान उमेदवार नसल्याने त्यांची कोंडी हाेऊ शकते. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती एकसंध राहिली तर विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार हे निश्चित आहे.राज्यात गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक पार पडली. महायुती व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत झाली असली, तरी जागा वाटप करताना दोन्हीकडील नेत्यांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी नाराजीचा फटकाही बसला. लोकसभेला ही अवस्था तर विधानसभेला इच्छुकांची संख्या आणि वाटणीला येणाऱ्या जागा पाहता, मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत स्वबळ आजमावले तर काय होऊ शकते? याची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निकालानंतर कोणी कोणत्या मतदारसंघात मदत केली आणि कोणी टांग मारली हे उघड होणार असल्याने त्यानंतरच स्वबळावर की एकत्रित लढायचे, याचा निर्णय होऊ शकतो.

कोल्हापुरात दहा विधानसभा मतदारसंघांतील स्थिती पाहिली तर दहाच्या दहा ठिकाणी ताकदवान उमेदवार एकाही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे स्वबळाची चाचपणी असली तरी येथे एकमेकांचा हात धरूनच निवडणूक लढवावी लागणार आहे.असे आहेत पक्षनिहाय आमदारमतदारसंघ  -  आमदार  -  पक्ष

  • शिरोळ -  राजेंद्र पाटील-यड्रावकर - अपक्ष
  • इचलकरंजी - प्रकाश आवाडे -  अपक्ष
  • हातकणंगले - राजू आवळे  -  काँग्रेस
  • शाहूवाडी - विनय कोरे  - जनसुराज्य
  • कागल - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  • चंदगड - राजेश पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
  • राधानगरी - प्रकाश आबीटकर  - शिंदेसेना
  • कोल्हापूर उत्तर - जयश्री जाधव  - काँग्रेस 
  • कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील - काँग्रेस 
  • करवीर - स्वर्गीय पी. एन. पाटील - काँग्रेस 

येथे होणार त्रांगडे..महायुती :कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), समरजीत घाटगे (भाजप)चंदगड - राजेश पाटील (राष्ट्रवादी), शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर (भाजप)राधानगरी - प्रकाश आबीटकर (शिंदेसेना), के. पी. पाटील (राष्ट्रवादी)इचलकरंजी - प्रकाश आवाडे (ताराराणी), सुरेश हाळवणकर (भाजप)कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिंदेसेना), सत्यजित कदम व महेश जाधव (भाजप)शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर (शिंदेसेना), माधवराव घाटगे (भाजप)करवीर - चंद्रदीप नरके (शिंदेसेना), संताजी घाेरपडे (जनसुराज्य)

आघाडी :कोल्हापूर उत्तर - जयश्री जाधव व मालोजीराजे (काँग्रेस ), संजय पवार (उद्धवसेना)हातकणंगले - राजू आवळे (काँग्रेस), राजीव आवळे (राष्ट्रवादी शरद पवार गट), सुजित मिणचेकर (उद्धवसेना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024