कोल्हापूर : आदर असेल तर शाहू छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीने बिनविरोध करावे, असे आवाहन करण्याइतका बालिशपणा सतेज पाटील यांच्यात आला कोठून ? राजकारणात असे होत असते का ? असे प्रश्न पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी विचारले.उमेदवारीसंबंधी शाहू छत्रपती यांच्यासंबंधी आदर असल्याचे म्हटले होते. हा धागा पकडून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी खरोखर आदर असेल तर शाहू छत्रपती यांना बिनविरोध निवड करा, असे आवाहन केले होते. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांनी टिका केली.पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, समरजित घाटगे यांच्या उमेदवारीबद्दल मला काहीही माहिती नाही. कोल्हापूरची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. सद्या त्यांचे उमदेवार संजय मंडलिक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसंबंधी दिल्लीतील बैठकीसाठी आमचे नेते अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस गेले आहेत. ते महायुतीकडून कोणाला उमेदवारी देतील, त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहू. नेतृत्व करू. हाडाचे काडे करून निवडून आणू. निवडणुका जवळ आल्यानंतर विकास कामांचे उदघाटन करून फायदा घेण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष घेत असतात.
Kolhapur: सतेज पाटील यांना इतका बालिशपणा आला कोठून, हसन मुश्रीफ यांची विचारणा
By भीमगोंड देसाई | Published: March 09, 2024 2:00 PM