शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

कचरा तेथेच, ड्रेनेज कोठे, पार्किंग जेथे तेथे !

By admin | Published: March 18, 2015 11:42 PM

कसबा बावडा : मुख्य रस्त्यावर उभा मी, जीव मुठीत घेऊन मी ! --लोकमत आपल्या दारी

संतोष पाटील / रमेश पाटील ल्ल कोल्हापूरमुबलक पाणी आहे, तर ड्रेनेजची व्यवस्था नाही. रस्ते आहेत; पण पार्किंगचा फज्जा उडाला आहे. सुपीक जमीन तर सांडपाण्यामुळे नापीक होऊ लागली आहे. शहरातील सर्व कचरा बावड्यात येतो. मात्र, विल्हेवाटीची यंत्रणाच नाही. ‘मनपा’च्या मोठ्या चार शाळा असूनही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, अशा अनेक समस्या अस्सल ग्रामीणबाज असलेल्या कसबा बावडा परिसरातील नागरिकांनी बुधवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमाच्या व्यासपीठावर मांडल्या.राजर्षी शाहू विद्यामंदिर ( शाळा क्रमांक - ११) च्या पटांगणावर ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, महानगर वृत्तपत्र संघटनेचे संघटक शंकर चेचर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सहायक सरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील, मुख्य प्रतिनिधी विश्वास पाटील, भारत माने, राजाराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन हरिष चौगले, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक जयसिंग ठाणेकर, कसबा बावडा व्यापारी पतसंस्थेचे संचालक सचिन पाटील, शाहू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विलास पिंगळे, शिक्षिका स्मिता वरेकर, सुजाता आवटी व शीतल घराळ, आदी उपस्थित होते.शहरातील सर्वांत वेगाने व विस्तारणारे उपनगर म्हणून कसबा बावडा परिसराची ओळख आहे. जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालये बावड्याच्या वेशीवर आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजाराम साखर कारखाना, शिरोली औद्योगिक वसाहत यामुळे बावड्यातील मुख्य रस्ता नेहमीच गजबलेला असतो. त्यातच पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. वाहतुकीच्या समस्येमुळेच गेल्या महिन्याभरात दोन व्यक्ती अपघात ठार झाल्या आहेत. लहान-मोठे अपघात हे तर बावडेकरांच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. शहरातील सर्व मैला बावड्यातील सांडपाणी केंद्रात आणला जातो. मात्र, बावड्यात ड्रेनेज लाईनच नाही. नियमित स्वच्छता न केल्याने डासांचे साम्राज्य आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहेच नाहीत. अनियमित व अस्वच्छ पाणीपुरवठा होतो, अशा अनेक तक्रारींचा पाढा परिसरातील नागरिकांनी या व्यासपीठावर मांडला.समस्या सम-विषम तारखेस पार्किंग करणे, अतिक्रमण हटवून रस्ता रिकामा करणे, तीन महत्त्वाच्या ठिकाणी रिक्षा स्टॉपसाठी जागा उपलब्ध करणे, पदपथ पूर्ण झालेली नाहीत, तर काही ठिकाणच्या पदपथावर दुकाने थाटलेली आहेत. सणावेळी तर मुख्य रस्त्यावरच व्यापार थाटला जातो. या प्रशासकीय स्तरावर सहज सोडविण्यासारख्या समस्या आहेत. त्याचे प्रशासनाने निराकरण करण्याची मागणी बहुतांश नागरिकांनी यावेळी केली.‘लोकमत’ने परिसरातील समस्या मांडण्यासाठी नागरिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. या व्यासपीठावर कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी न करता समस्या मांडून त्याची सोडवणूक होणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. रहिवाशांनी या ठिकाणी उपस्थित राहून समस्या मांडाव्यात.शेती नापीकचा धोकासांडपाणी प्रक्रिया केंद्रातून दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. परिसरातील शेतातून वाहणाऱ्या या पाण्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात नापीक होत आहे. - हरिष चौगलेपाणंदींची अवस्था बिकटबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे. गावठाणातील रस्ते पूर्ण झाले असले तरी शेतातील पाणंदींची अवस्था बिकट आहे. - हरिबा रणदिवेवाहतूक धोकादायकरस्त्यावरील वाढलेल्या व अवास्तव रहदारीमुळे जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागतो. - मालूबाई चौगलेरिक्षा स्टॉपसाठी जागा हवीमुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी रिक्षांना स्टॉप आहेत. रिक्षांसाठी हक्काची जागा नसल्याने ती उपलब्ध व्हावी. - शिवाजी चव्हाणसंरक्षण कठडे हवेतराजर्षी शाहू विद्यामंदिराभोवती संरक्षक कठडे उभे करावेत. जेणेकरून शाळेचे पटांगण सुरक्षित राहील. - सुनील पोवारस्पीड बे्रकर हवेतप्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावर स्पीड ब्रेकर करावेत. - रघुनाथ चौगलेपदपथाचा वापर हवापादचारी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. नागरिकांनी चालण्यासाठी पदपथाचा वापर करावा. - सुहास चौगलेगटारी सफाई व्हावीमुख्य गटारींची दररोज सफाई होत नाही. दुर्गंधी पसरते. - नामदेव जाधववुडन कोर्ट करावेपॅव्हेलियन बॅडमिंटन हॉलची नियमित स्वच्छता केली जात नाही. पालिके ने वुडन कोर्ट करावे. - प्रणव आळवेकरपदपथावर अतिक्रमणपदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पदपथ रिकामे करून पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करावेत. - एस. डी. कोरवीविद्युत खांब बदलाचौगले गल्ली रस्त्याच्या मध्येच असणारे जुने विद्युत खांब बदलून नवीन जागेत स्थलांतरित करावेत. - पी. के. पाटीलस्टॉपसाठी जागा द्यारिक्षा स्टॉपसाठी मुख्य रस्त्यावर स्वतंत्र जागा मिळावी.- पांडुरंग जाधव