कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून घेतली आहे. त्यासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्याचा शब्द दिला आहे. हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्द असून मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात केले.आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे-पाटील हे मुंबईत २६ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यासाठी शनिवारी अंतरवाली सराटी येथून त्यांनी मुंबईकडे प्रस्तान सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आरक्षणाची भूमिका मांडली.मंत्री पाटील म्हणाले, फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय देण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे-पाटील यांना दिला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाजवळ बसून त्यांनी आरक्षणाची शपथ घेतली आहे. सध्या गावागावात कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जरांगे यांनी मुख्यमंत्री व सरकारवर विश्वास ठेवावा. समाजाला आरक्षण नक्की मिळेल.
मराठा समाजाला आरक्षण देणारच, जरांगे-पाटीलांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
By पोपट केशव पवार | Published: January 20, 2024 6:52 PM