शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
3
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
4
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
5
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
6
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
7
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
8
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
9
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
10
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
11
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
12
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
13
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
14
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
15
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
16
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
17
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
18
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
19
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
20
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार

मानधनवाढीसह 'मनस्ताप'ही; अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भावना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 4:23 PM

शासनाच्या अन्य योजनांची कामे करण्याचीही सक्ती

कोल्हापूर : राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे ३ हजार व २ हजारांची वाढ करताना त्यांच्या कामाच्या वेळातही २ तासांची वाढ केली. प्रोत्साहन भत्ता देताना एवढ्या अटी घातल्या आहेत की, हा भत्ता त्यांना कसा मिळू नये, अशीच व्यवस्था केली असल्याची या कर्मचाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मुळातच या कर्मचाऱ्यांना जे मासिक मानधन दिले जाते ते कधीच नियमित नसते. शासकीय कर्मचाऱ्यांना, बँक नोकरांना, प्राध्यापकांचा पगार एकही दिवस पुढेमागे होत नाही; परंतु या श्रमजीवी घटकाला मात्र त्यांच्या कष्टाचे मानधन शासन एका विशिष्ट तारखेला कधीच देत नाही. ५ हजार मानधनवाढ करावी म्हणून ५२ दिवस संप केला; परंतु तरीही सरकारला फारसा पाझर फुटला नाही. निवडणुका तोंडावर असल्यानेच आता ४ ऑक्टोबरला शासन आदेश काढून ३ हजार मानधन वाढ आणि २ हजार भत्ता वाढ जाहीर केला आहे; परंतु हा भत्ता मिळताना त्यासाठी १० अटी घातल्या आहेत.

त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळणार आहे. त्या अटी व्यवहार्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. खुजी, स्थूल आणि लठ्ठ मुलांचे प्रमाण कमी करणे, अशी एक अट आहे. खुज्या मुलांची उंची सेविका कशी वाढवणार, असा त्यांना पडलेला प्रश्न आहे. महिन्यातून किमान २५ दिवस ताजा व गरम खाऊ द्यावा, असे म्हटले आहे; परंतु सुटी, आजारपण यामुळे ते मूल आलेच नाही तर त्यास सेविका काय करणार, याचे उत्तर नाही. शासनाच्या अन्य योजनांची कामे करण्याचीही सक्ती केली आहे. बीटची सरासरी काढून ती चांगली असेल तर भत्ता मिळणार आहे. म्हणजे जाहीर केलेला लाभ कसा मिळणार नाही, अशी व्यवस्था केली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना अपेक्षित मानधन वाढ मिळाली नाही. पेन्शन, ग्रॅच्युइटीचा निर्णयच सरकारने घेतला नाही. प्रोत्साहन भत्ता देतानाही तो कसा मिळणार नाही, अशाच अटी घातल्या आहेत. त्यामुळे सरकारविरुद्धचा संघर्ष यापुढेही करावाच लागेल. - सुवर्णा तळेकर, सचिव, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघ, कोल्हापूर.

दृष्टिक्षेपात राज्यातील अंगणवाडी संख्या

  • एकूण प्रकल्प ५५३
  • अंगणवाडी सेविका : ११०५५६
  • मदतनीस : ११०५५६
  • मानधन हिस्सा : केंद्र शासन - ६० टक्के, राज्य शासन - ४० टक्के
  • कोल्हापूर जिल्ह्यातील सेविका-मदतनीस : ८५००

किती झाली मानधनवाढ

  • अंगणवाडी सेविका : ३०००
  • मदतनीस : २०००

प्रोत्साहन भत्ता-निकष पूर्ण झाल्यासच

  • सेविका : १६०० ते २०००
  • मदतनीस : ८०० ते १०००
टॅग्स :kolhapurकोल्हापूर