शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

वीज उपकेंद्र ठरतेय पांढरा हत्ती

By admin | Published: November 03, 2014 9:25 PM

बोलोली उपकेंद्र : कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेले उपकेंद्र्र बंदच

मच्छिंद्र मगदूम- सांगरूळ -बोलोली (ता. करवीर) येथे बारा वाड्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उपकेंद्र्र सुरू केले आहे. याठिकाणी कळे येथून आसगाव उपकेंद्रावरून नवीन विजेची लाईन जोडली आहे; पण या लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या लाईनच्या तारांना जोडलेले इन्शोलेशन (चिनी मातीच्या प्लेट) वारंवार फुटत आहेत. परिणामी, लाईन नेहमी बंदच असते. यामुळे बोलोली सबस्टेशन पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून उपकेंद्र्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.महावितरण कंपनीने कळे असगाव येथून २० किलोमीटरनंतर नवीन लाईन टाकून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले. सबस्टेशनच्या मुहूर्तापासून या लाईनमध्ये बिघाड असून, गेली दीड वर्षे हे काम महावितरण कंपनीला सुरळीत करता आलेले नाही. सध्या कोगे सबस्टेशनवरून लाईट जोडली आहे; पण यामुळे लोडशेडिंग वाढत आहे. कळे येथून वीजपुरवठा सुरू केल्यानंतर पोलवरील इन्शोलेशन फुटण्याचे सत्र गेले दीडवर्ष सुरू आहे. महावितरण कंपनी यांची ट्रायल आणखी किती वर्षे घेणार, अशी विचारणा शेतकरीवर्गांतून होत आहे. गेले तीन महिने हे काम पूर्णपणे बंदच आहे. ही लाईन सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर तासभरसुद्धा लाईन सुरू राहत नाही. यामुळे कळे येथून आणलेली लाईन नेहमी बंदच असते. विजेचे भारनियमन वाढत असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे उपकेंद्र्र व लाईनच्या कामाची चौकशी व्हावी व शेती पंपासाठी पूर्ण क्षमतेने वीज मिळावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून जोर धरत आहे.बोलोली उपकेंद्राचीची कळे ते बोलोली लाईनची तातडीने दुरुस्ती करावी, भारनियमन रद्द करून शेतीसाठी १२ तास वीज द्यावी व उपवडे तलावातील पाणी सोडलेल्या वेळेतच वीजपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडू.- प्रकाश पाटील, उपसरंपच, आमशी.