शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

कोल्हापूर जिल्ह्यात १९७२ ते २०१९ पर्यंत सर्वात कमी, सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले आमदार कोण.. वाचा सविस्तर

By राजाराम लोंढे | Published: October 24, 2024 5:31 PM

काेल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या बहुतांशी विधानसभा निवडणुका अटीतटीच्या

राजाराम लोंढेकोल्हापूर : लोकसभेच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुका नेहमीच अटीतटीच्या हाेतात. काटाजोडी लढतीत अगदी कमी मताधिक्याने अनेकांना गुलाल लागला आहे. काहीजण भरघोस तर काहींना अगदी थोडक्या मताधिक्यांनी चुटपुट लावणारे जय-पराजय कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवले आहेत. त्यामध्ये सर्वात कमी केवळ ११ मतांनी दिवंगत आमदार नरसिंगराव पाटील हे विजयी झाले तर सर्वाधिक ७३ हजार १७४ इतक्या मताधिक्यांनी आमदार प्रकाश आवाडे हे विजयी झाले.काेल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या बहुतांशी विधानसभा निवडणुका अटीतटीच्या व इर्षेने झालेल्या आहेत. पूर्वरचनेपूर्वी मतदार संख्या कमी असल्याने सर्वच ठिकाणी काटाजोड लढती व्हायच्या. कमी मताच्या निवडणुका असल्याने अनेक वेळा अपक्षही मुसंडी मारत होते. मात्र, २००९ नंतर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने एक गठ्ठा मतावरच निकाल फिरू लागले. मतदारसंघाची व्याप्ती वाढल्याने उमेदवारांची दमछाकही होत आहे. कमी कालावधीत नवख्या उमेदवारीला मतदारापर्यंत पोहचता येत नाही.

आधी ‘भरमूण्णां’ना गुलाल नंतर ‘नरसिंगरावां’चा जल्लोष

कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात कमी म्हणजेच ११ मतांनी जनसुराज्य पक्षाचे नरसिंगराव पाटील यांनी विजयी मिळवला. ‘चंदगड’ मतदारसंघात त्यावेळी जनसुराज्यकडून नरसिंगराव पाटील, शिवसेनेकडून भरमूण्णा पाटील तर राष्ट्रवादीकडून गोपाळराव पाटील रिंगणात हाेते. तिघांना जवळपास तेवढीच मते मिळाल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहचली होती. भरमूण्णा पाटील हे १३ मतांची विजयी झाल्याचे समजताच त्यांनी गुलालाची उधळण केली. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही, संपूर्ण मतमोजणीनंतर नरसिंगराव पाटील हे ११ मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले.

१९७२ ते २०१९ पर्यंत सर्वाधिक मताधिक्याने विजयी 

निवडणूक उमेदवार  पक्ष   मताधिक्य
१९७२   रत्नाप्पाण्णा कुंभार    काँग्रेस ४२,९१८
१९७८उदयसिंगराव गायकवाड काँग्रेस     ३९,३४५
१९८० बाबासाहेब पाटील-सरुडकर काँग्रेस    ३३,२९१
१९८५ जयवंतराव आवळे काँग्रेस    २१,६४३
१९९०श्रीपतराव बोंद्रे काँग्रेस    ३५,१४७
१९९५ दिग्विजय खानविलकर काँग्रेस    ३१,५३२
१९९९प्रकाश आवाडे काँग्रेस    २२,९६३
२००४  प्रकाश आवाडे काँग्रेस    ७३,१७४
२००९हसन मुश्रीफ  राष्ट्रवादी काँग्रेस ४६,४१२
२०१४ प्रकाश आबीटकर शिवसेना ३९,४०८
२०१९ ऋतुराज पाटील काँग्रेस४२,७०३

सर्वात कमी मताधिक्य 

२००४नरसिंगराव पाटील जनसुराज्य पक्ष ११
१९८५सदाशिवराव मंडलिक काँग्रेस २३१
२००४ सत्यजीत पाटील शिवसेना ३८८
१९९० श्रीपतराव शिंदे जनता दल ६७४
२०१४ चंद्रदीप नरके शिवसेना  ७१०
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024