शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नेसरी-गिजवणेत विकास आघाडीचा पाठिंबा कुणाला ?

By admin | Published: February 20, 2017 12:23 AM

गडहिंंग्लजचे राजकारण : शिंदे-गड्यान्नावर यांच्या निर्णयाकडे लक्ष

राम मगदूम ल्ल गडहिंग्लजराष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटलेल्या गडहिंग्लज तालुका विकास आघाडीचे प्रमुख जनता दलाचे ज्येष्ठ नेते व गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे व स्वाभिमानी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर हे राष्ट्रवादीच्यादृष्टीने प्रतिष्ठेचे असणाऱ्या गिजवणे व नेसरी गटात आघाडीचा पाठिंबा कुणाला देतात, याकडेच गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.कागल मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या गिजवणे गटात गडहिंग्लज कारखान्याचे संचालक सतीश पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. ते विद्यमान जि. प.सदस्या शैलजा पाटील यांचे पती व आमदार हसन मुश्रीफ यांचे निकटचे सहकारी आहेत. त्यामुळेच ही जागा टिकविण्यासाठी मुश्रीफ यांनी शक्ती पणाला लावली आहे.राष्ट्रवादीचे पाटील यांच्याविरुद्ध भाजपाने संजय बटकडली यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी भाजपचे नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश शहापूरकरांनी ताकद लावली आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर काँगे्रसच्या तिकिटावर लढणाऱ्या दिग्विजय कुराडे यांच्यासाठी त्यांचे पिताश्री किसनराव कुराडे, चुलते सुरेश कुराडे व अनिल कुराडे यांनी ताकद लावली आहे.स्व. कुपेकरांचा बालेकिल्ला म्हणून जिल्हाभर ख्याती असणाऱ्या नेसरी गटात राष्ट्रवादीने विद्यमान सदस्या मीनाताई जाधव यांचे पती माजी सभापती दीपकराव जाधव यांनाच चाल दिली आहे. अजातशत्रू म्हणून परिचित असलेले जाधवदेखील गडहिंग्लज कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर व भाजपाचे हेमंत कोलेकर यांनी दंड थोपटले आहे.तथापि, गडहिंग्लज तालुक्यातील नूल, हलकर्णी व भडगाव गटातील जागा ताकदीने लढणाऱ्या जनता दल, स्वाभिमानी, हत्तरकी व पताडे गट युतीच्या आघाडीने गिजवणे व नेसरी गटात जि.प.साठी उमेदवार उभे न करता ‘हातचा’ राखून ठेवला आहे. हत्तरकी, पताडेंसाठी शिवसेनेची माघार !हत्तरकी गटात रेखाताई राजकुमार हत्तरकी यांच्यासाठी, तर भडगाव गटात जोत्स्ना प्रकाश पताडे यांच्यासाठी, तर महागाव गणात जनता दलाचे बाळकृष्ण परीट यांच्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता राष्ट्रवादीच्या विरोधकांनाच आघाडी पाठिंबा देईल, असे दिसते. हा निर्णय शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.